प्राचार्य. डॉ.मृणाल काळे उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सन्मानित…

159

आनंदनिकेतन महाविद्यालय विविध पुरस्काराने सन्मानित.(प्राचार्य. डॉ.मृणाल काळे उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सन्मानित)

प्रतिनिधी संकेत कायरकर

सोमवार 6 ऑक्टोबर 2025 रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात वरोरा येथील आनंदनिकेतन कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांना गोडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विद्यापीठाच्या या वर्धापन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. पद्मश्री डॉ चंद्रशेखर मेश्राम, विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.प्रशांत बोकारे,प्र. कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ.मृणाल काळे यांना प्रदान करण्यात आला.यासोबतच महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून श्री.रुपेश कुत्तरमारे व उत्कृष्ट विद्यार्थिनी कु.श्रुती धोटे यांनाही या कार्यक्रमात पुरस्कृत करण्यात आले. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांना विद्यापीठाची जनरल चॅम्पियनशिप घोषित झाली होती.हे सर्व पुरस्कार 30 सप्टेंबर 2025 ला जाहीर झाले होते. महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रा.तानाजी बायस्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.अधिक आनंदाची बाब म्हणजे विद्यापीठाचा जिल्हा स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटला,कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक व रासेयो स्वयंसेवक श्री.मयूर हनवते यांना जाहीर झाला होता.याच कार्यक्रमात मा.डॉ.चंद्रशेखर मेश्राम व मा.डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय एकक पुरस्कार प्राचार्य डॉ.मृणाल काळे व कार्यक्रम
अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक व प्रा.सुरेश राठोड यांनी स्वीकारला. महाविद्यालयातील उत्कृष्ट रा से यो स्वयंसेवक श्री. मयूर हनवते याला देखील याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयातील प्रा.डॉ.संजय साबळे, प्रा.डॉ.रामदास कामडी व प्रा.डॉ.रंजना लाड या पुरस्कार वितरण समारंभाला महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापनदिनी झालेल्या या कार्यक्रमात आनंदनिकेतन महाविद्यालयाला सर्वात जास्त म्हणजे सात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मा. डॉ चंद्रशेखर मेश्राम,मा.डॉ.प्रशांत बोकारे,मा. डॉ.श्रीराम कावळे,व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,उपस्थित सर्व मान्यवर,विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक,निमंत्रित यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.
महारोगी सेवा समितीचे सचिव आ.डॉ. विकास आमटे,आनंदवन विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग, विद्यार्थी सर्वच जण महाविद्यालयाच्या या भरघोस यशाचे कौतुक करत आहे.