प्रतिनिधी प्रीतम गग्गुरी अहेरी
सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर विद्यार्थ्यांना व सफाई कामगारांना भेटवस्तू वाटप व ग्रामीण रुग्णालयात फळ वितरण
अहेरी:- अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला.
भाग्यश्री ताईंनी अहेरी येथील एकलव्य निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन आणि त्यांच्या सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
यानंतर त्यांनी अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप केले तसेच सफाई कामगारांना भेटवस्तू देत त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या सामाजिक आणि मानवतावादी उपक्रमामुळे समाजात प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाचा संदेश पोहोचला आहे.
त्यानंतर अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल मध्ये वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे विभागीय अध्यक्ष शाहीन भाभी हकीम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऋतुराज हलगेकर, नगरसेवक अमोल मुक्कावार, श्रीनिवास वीरगोनवार, श्रीनिवास चटारे, सुमित मोतकुरवार, इमायत शेख,अफसर शेख,संदीप गुमलवार, अजय नागुलवार, अनुराग बेजलवार, अनुराग जक्कोजवार, मुकेश रत्नावार, अमोल रामटेके, राहुल दुर्गे, बाबुभाई शेख, नफी शेख,
शैलेश गेडाम, ऋषी पोरतेट, स्वप्निल श्रीरामवार, महेश बाकेवार, तसेच एकलव्य निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चौधरी, किरण सहारे, सन्मान थूल, आशिष कोकाटे, युवराज भरडकर, प्रवीण सोयाम आणि अहेरी शहरातील व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.