धावत्या ट्रॅक्टरच्या चाकात फसला युवक, थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद, चंद्रपूर शहरातील घटना…

356

संपादक: प्रशांत बिट्टूरवार

चंद्रपूर

ट्रॅक्टर वर बसलेला युवक तोल जाऊन थेट मागील चाकात फसला. नशीब बलवत्तर म्हणून ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेले नाही. हा थरारक अपघात रविवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारासचा असून तो एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट रामनगर मार्गावरील एका दुकानाच्य सीसीटीव्हीतुन पुढे आलेल्या या अपघाताला बघताच अंगावर काटे उभे होत आहेत. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाता मधील संबंधित युवक कुठला आहे याचा उलगडा झाला नसला तरी प्रसंगावधान राखून नागरिकांनी त्याला धावत्या ट्रॅक्टरच्या चाकातून बाहेर काढल्याचे दिसत आहे.

हीच ती CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली घटना

शहरात सर्वत्र देवी विसर्जनाचा जल्लोष सुरु असून रात्री उशिरा पर्यंत देवी भक्त विसर्जन स्थळावरून परतत आहेत. सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये ट्रॅक्टर वर बसलेला युवक अचानक खाली कोसळल्याचे दिसत आहे. कोसळता क्षणीच तो ट्रॅक्टरच्या मागील चाकात अडकला. यात तो फरफटत जाताना दिसत आहे. लोकांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला असून सदर युवकावर उपचार सुरु आहे