प्रतिनिधी गौरव मोहबे
बाबूपेठ परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावे . तसेच निष्काळजी पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
चंद्रपूर – बाबूपेठ परिसरातील साईबाबा मंदिर ते जुनोना चौक हा परिसर अतिशय वरदळीचा असून या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी वडील व त्यांचा ७ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेनंतर आम आदमी पार्टी चे राजू केले आहे. कुडे तर्फे सातत्याने सदर ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी करण्यात येत असली तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष
काल दुपारी जुनोना चौकात पुन्हा एकदा अपघात होऊन एका युवकाचा थार चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात दोन ठोस मागण्या ठेवण्यात
आल्या आहे
अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत जेणेकरून भविष्यातील अपघातांना आळा बसेल. 2. मृतकाच्या परिवाराला १० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी.
परंतु, आंदोलनादरम्यान रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी आंदोलनकर्त्याशी संवाद न साधता विषय समजवून न घेता दादागिरी करून जन प्रतिनिधी ची शर्टची कॉलर पकडून ३० मीटरपर्यंत ओढत नेत धक्काबुक्की केली. जनतेसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्याशी अशी वागणूक करणे ही गंभीर बाब असून यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन जनतेला सुरक्षा पूरविन्या करिता आहे की मुजोरी करण्याकरिता आहे असा जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
आम आदमी पार्टी तर्फे या गैरवर्तणुकीविरुद्ध वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्यात आलेली असून संबंधित ठाणेदार आसिफ राजा शेख यांचेवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या मार्गावरून रोज शेकडो अवेध्य रेती चे जड वाहन चालत असतात परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेती तस्करावर पोलीस विभाग व महसूल विभाग यांच्या मेहरबानीमुळे रोज अपघात होणे नित्याचे झाले आहे. जर
न्याय मिळाला नाही तर आम आदमी पार्टी आंदोलनाचा इशारा दिले आहे.