Home Breaking News मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या कॉफी...

मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण संपन्न …. 

179

सहसंपादक श्याम मशाखेत्री

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी_फडणवीस साहेब यांच्या हस्ते जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या कॉफी_टेबल_बुकचे अनावरण संपन्न झाले. या प्रसंगी पालकमंत्री मा. प्रा. डॉ. श्री. अशोकही_उईके साहेब , आमदार श्री. सुधीरजी_मुनगंटीवार, आमदार श्री. देवराव_भोंगळे, आमदार श्री. करण_देवतळे सह आपण देखील या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होतो. मा. मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या भाषणात सांगितले की, खनिज विकास निधीतून आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा व पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून वेगाने विकसित होत असून, सुमारे १.५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यावरण संतुलन राखले जाईल आणि १००% स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच महाराष्ट्रातील ‘ग्रीन कव्हर’ वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत.

Don`t copy text!