रेगडी येथे बीटस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन…
क्रीडा संमेलनात सात आश्रमशाळांचा सहभाग
क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी एकूण ६१४ खेळाडू उतरणार मैदानात
प्रतिनिधी गौरव बुरांडे
रेगडी:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रेगडी येथे बीटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे बुधवार,२४ सप्टेंबर रोजी रेगडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या पटांगणात थाटात उद्घाटन झाले.यात भाडबिडी बिटातील एकूण सात आश्रम शाळेतील समारे ६१४ आदिवासी खेळाडू क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.सदर क्रीडा संमेलनाचे आयोजन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी सरपंचा सुरेखाताई गेडाम हे होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश तीम्मा,सुरेशभाऊ शाहा, फक्री नरोटे, विलास महा, डॉ मेश्राम,प्रशांत शाहा, दास सर,घोंगडे सर, पदलांवार सर,केंद्र प्रमुख बंडू दुधबळे व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम दरम्यान रेगडी आश्रमशाळेतील मुलींनी स्वागत गीत व आदिवासी रेला नृत्य सादर केले.
रेगडी बीट स्पर्धेत रेगडी,भाडबिडी,गुंडापल्ली, अड्याळ,कन्हाळगाव, मारखंडा देव, चामोर्शी या सात आश्रमशाळांचा समावेश आहे.१४,१७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी,खो- खो, व्हॉलीबॉल,हँडबॉल,रिले या सांघिक खेळासह लांबउडी ,उंचउडी,गोळाफेक,भालाफेक, थाळीफेक ,धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मैंद सर,संचालन नागोसे मॅडम तर आभार प्रदर्शन नरेंद्र केळकर सर यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक दोनाडकर सर,बहिरेवार सर,गैनवर सर, कुळमेथे सर, दुर्गा नेवारे मॅडम, बनसोड सर, कुसराम सर,शेळके सर,भाजीपाले मॅडम,हजारें सर पेंद्राम सर,गोटा सर, वाकडे सर,नंदिनी मॅडम, माडेमववार सर,मुरकुटे सर,परतेकी सर ,सातरे सर, नवाज सर,राठोड सर, कुनघाडकर सर व रेगडी बिटातील कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.







