अहेरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक…

199

अहेरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, 

प्रतिनिधी रुपाली रामटेके

विधानसभा निरीक्षक संतोषजी रावत आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा माजी जि. पं. अध्यक्ष अजय भाऊ कंकडलावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांसह (स्थानिक स्वराज संस्थांच्या) निवडणुकांबाबत संघटन बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हनुमंतजी मडावी, अहेरी तालुका अध्यक्ष डॉ.निसार (पप्पू) हकीम,माजी सरपंच अज्जू पठाण, मुस्ताक हकीम,रामप्रसाद मुंजमकर,नरेंद्र गर्गम,अरुण बेडूलवार, गुरुभाऊ गुरनुले, प्रकाश दुर्गे, माजी जि. पं. सदस्य सुनिताताई कन्नाके,सरपंच वंदना दुर्गे, गीताताई चाकूरकर, सुरेखाताई आलाम,पुष्पा आत्राम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.