Home Breaking News नाशिक येथे पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याचा गोंडपिपरीत निषेध…

नाशिक येथे पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याचा गोंडपिपरीत निषेध…

244

व्हॉईस ऑफ मिडिया तर्फे तहसीलदार यांना निवेदन..

गोंडपिपरी प्रतिनिधी शरद कुकुडकर

नाशिक येथील पत्रकारांवरती भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा निषेध निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे कारवाई संदर्भात व्हॉईस ऑफ मीडियाने मागणी केली आहे.दिनांक २० सप्टेंबर रोजी (शनिवार) त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्के आदींनी मारहाण करून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दि.२३ मंगळवारी व्हॉईस ऑफ मिडिया तालुका गोंडपिपरी तर्फे तहसीलदार शुभम बहाकर यांना निवेदन देण्यात आले.

पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी, चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तींवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असह्य बाब असून निवेदनातून घटने संदर्भात खालील मागण्या ठेवण्यात आल्या.

१)सदर प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

2. राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.

3. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण आखावे. अशा मागण्याचे निवेदन आज सादर करण्यात आले.यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे तालुकाअध्यक्ष राजू झाडे,पत्रकार सुरज माडूरवार, राजकपूर भडके, चंद्रजीत गव्हारे,समीर निमगडे, आशिष निमगडे, प्रशांत कोसनकर, साईनाथ मास्टे उपस्थित होते.

Don`t copy text!