प्रतिनिधी गौरव मोहबे
भरपावसात महिलांची पाण्यासाठी धावपळ, प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरात चार दिवसांपासून नळाचा पाणी पुरवठा ठप्प!
चंद्रपूर : शहरातील जलनगर, रहमत नगर, सिस्टर कॉलनी, नगीनाबाग या भागांतील नागरिकांना गेल्या चार दिवसांपासून पाण्याच्या थेंबासाठी आक्रोश करावा लागत आहे. भर पावसाळ्यात घराघरात पाण्याची कमतरता भासत असल्याने महिलांना बादल्या, घागरी घेऊन पावसात भटकंती करावी लागत आहे.
पावसाचे पाणी अंगावर पडते, पण प्यायला एक थेंब शुद्ध पाणी मिळत नाही, अशी हृदय पिळवटून टाकणारी अवस्था निर्माण झाली आहे. लहान लेकरांची तहान भागवण्यासाठी आईंना पावसात रडत रडत पाण्यासाठी पळापळ करावी लागते. वृद्धांना पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. घरात स्वयंपाक, मुलांचे शाळेचे डबे, दैनंदिन कामे सर्व थांबून पडले आहेत. महिलांच्या डोळ्यांतून अश्रू, तर मनात प्रचंड संताप दिसून येतो. ‘चार
दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. घरात पाणी नाही. मुलांना कसे सांभाळायचे, जेवण कसे करायचे याचा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. पाणी मागण्यासाठी फोन केला तर महानगर पालिका अधिकारी फोन उचलत नाहीत,’ अशा शब्दांत स्थानिक महिलांनी प्रशासना विषयी रोष व्यक्त केला. चार दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. घरात पाणी नाही. मुलांना कसे सांभाळायचे, जेवण कसे करायचे याचा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. पाणी मागण्यासाठी फोन केला तर महानगरपालिका अधिकारी फोनसुद्धा उचलत नाहीत,’ अशा शब्दांत स्थानिक महिलांनी प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला महानगरपालिकेकडे वारंवार धाव घेतली गेली, परंतु ‘दुरुस्ती सुरू आहे’ एवढेच सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही. चार दिवसांपासून तहानलेल्या नागरिकांच्या घराघरांत पाण्यासाठी आवाज घुमतोय.







