सहसंपादक श्याम मशाखेत्री
विकासाभिमुख कार्य व सेवाभाव हीच पक्षप्रवेशला प्रेरणा- आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन.
गडचांदूर:
देशाच्या व राज्याच्या प्रगतीकरता भारतीय जनता पार्टी प्रतिबद्ध असून शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तत्पर आहे. आणि याच तत्पर भावाने प्रेरीत होऊन आज मोठ्या संख्येने भाजपात पक्षप्रवेश होत असल्याचे मत आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.
गडचांदूर येथील गांधी चौकात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री. स्वप्निल छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांनी आयोजित केलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी श्री. स्वप्निल छाजेड यांचेसह राकेश जोशी, आशिष जोशी, करण भारती, निर्भय शेरकी, अनिल शेंडे, संजय नागीनवार, राम किशन आलम, अंबादास सरपे, सागर मोहूर्ले, अंकित सिंग, मयुर राणदड, आशुतोष पवार, मनोज परचाके, आकाश वेटी, गुड्डू टेकाम, विवेक शेडमके, विशाल पवार, दिनेश हिवरे व राकेश दबले यांनी भाजपात पक्षप्रवेश केला.

आमदार भोंगळे पुढे बोलताना म्हणाले की, श्री. स्वप्निल छाजेड आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी गडचांदूरच्या प्रगतीकरता आणि जनतेच्या हितासाठी शहरात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, आम्ही पुर्ण शक्तीनिशी त्यांच्या सोबत आहोत. असेही ते म्हणाले.
या पक्षप्रवेशाला भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, गडचांदूर शहराध्यक्ष अरूण डोहे, राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, गोपाल मालपाणी, धनंजय छाजेड, सतीश बेतावार, रोहन काकडे, राजेश राठोड, महादेव एकरे, महेश घरोटे,संदीप शेरकी हितेश चव्हाण, हरी घोरे, रामसेवक मोरे, विश्वंभर जाम, सत्यदेव वर्मा, रवी बंडिवार, अशोक झाडे, शंकर आपुरकर, गणेश आडे, संतोष छाजेड, तुषार देवकर, हरी कुसळे आदिंसह भाजपचे कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







