अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना गडचिरोली जिल्ह्यात येण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने पुणे येथे निमंत्रण दिला
सहसंपादक श्याम मशाखेत्री:
दिनांक 15 सप्टेंबर 2025 गडचिरोली
जागर नामचा दशकपूर्ती सोहळा
“जे जे जगी जगी जगते तया, माझे म्हणा, करुणा करा”
या भावनेशी प्रामाणिक राहून सप्टेंबर 2015 साली नाम फाउंडेशन ची स्थापना झाली आणि आज फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे या वाटचालीस अनेक सबळ हाताने माणुसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले हा मानवतेचा यज्ञ असाच अखंडपणे चालत राहील यासाठी आहे दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी दशकपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या या स्नेह मेळाव्यात जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांचा नाम फाउंडेशनचे वतीने नाना पाटेकर मकरंद अनासपुरे राज्याचे माहिती सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या स्नेह मेळाव्यात महाराष्ट्र राज्यातील विविध प्रमुख सामाजिक उपक्रम करणारे प्रामुख्याने नाम फाउंडेशन ला मदत करणारे विविध कंपन्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आले या स्नेह मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे 50 पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील शेतकरी व सरपंच, उपसरपंच कार्यकर्ते पुणे येथे रवाना उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री (भारत सरकार) माननीय उदयजी सामंत, उद्योग मराठी भाषा मंत्री (महाराष्ट्र राज्य) माननीय चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (महाराष्ट्र राज्य) प्रामुख्याने उपस्थित या कार्यक्रमात आयोजक श्री नाना पाटेकर संस्थापक अध्यक्ष नाम फाउंडेशन पुणे,श्री मकरंद अनासपुरे संस्थापक सेक्रेटरी नाम फाउंडेशन पुणे,प्रामुख्याने उपस्थित होते व जिल्ह्यातील मानवाधिकार संघटनेचे
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा पौर्णिमा विश्वास,
संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक, देवानंद पाटील खुणे, सरपंच गोपाल पाटील उईके,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,राकेश भाऊ खुणे, पुरुषोत्तम भाऊ गोबाडे, नितेश भाऊ खुणे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, किशोर कुंडू, जिल्हा सचिव प्रकाश थुल,गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, तालुका उपाध्यक्ष किशोर देवतळे तालुका सचिव संतोष बुरांडे तालुका सचिव दिनेश मुजुमदार विलास वडेट्टीवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुपाली कावळे, पुष्पा करकाडे, पूनम हेमके विशाखा सिहं, लीना विस्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे लक्ष्मण उईके, विलास मडावी, प्रभाकर कुमोटी, व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
नाम फाउंडेशन च्या वतीने डॉ प्रणय भाऊ खुणे यांचा सत्कार केल्या बद्दल जिल्हा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या नाम फाउंडेशनचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.







