ऊर्जानगर नेरी येथील मंजूर पुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा-ग्रा.पं.सदस्य मदन चिवंडे यांची मागणी…

121

संपादक प्रशांत बिट्टूरवार

उर्जानगर क्षेत्रात नेरी व समतानगर या दोन वार्डमध्ये मोठा नाला आहे. या दोन वॉर्डमध्ये एक छोटा पुल बनलेला आहे. खा. अजय संचेती यांच्या निधी मधून सण २०१० मध्ये अंदाजे ८ लक्ष रुपये मंजूर करून सदर पुलाचे बांधकाम केले. या पुलचे बांधकाम ह्युम पाइप कलवर्ड स्वरूपाचे आहे. त्यामु‌ळे नाल्यावाटे येणारा बाहेरील कचरा या पाइप ला लटकतो आणि मोठ्या प्रमाणात पाण्याला अडथळा येत असल्याने वस्तीमध्ये पाणी परत येते. त्यामुळे दर पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान होत असते. या पुलामुळे जवळपास १५० घरांना पुराचा फटका सहन करावा लागतो. या अगोदर अश्या घटना या भागात झाल्या आहे.म्हणून या जुन्या पुला ऐवजी नवीन पूल निर्माण करून देण्यात यावा, ही मागणी लक्षात घेऊन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची दिनांक 22/7/2023 ला याआगोदर शिष्ट मंडळ भेट घेऊन हा विषय लक्षात आणून दिला होता.तेव्हा विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना सूचना देऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग येथील अधिकाऱ्यांनी घटना स्थळी पाहणी करून संबंधित पुलिया ची पाहणी करून अंदाज पत्रक बनविले. त्यानंतर अंदाजपत्रक व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्यशासनाच्या प्रधान सचिव,आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन,मंत्रालय, मुंबई येथे 4 मार्च 2024 ला प्रस्ताव पाठविण्यात आला.
परंतु तेव्हापासून हा प्रस्ताव मंत्रालयात पडलेला आहे. या अगोदर सुद्धा हा विषय आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिला होता.
प्रस्तावित पूल लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी ऊर्जानगर ग्रामपंचायत सदस्य मदन चिवंडे यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावन्याचे आश्वासन दिले.