प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर
वाहतूक परवाण्याचा दुरुपयोग करून गोंडपिपरी-खेडी मार्गाने होणारी सुरजागडची वाहतूक थांबवा
गोंडपिपरी-खेडी मार्गाने सुरजागड खाण प्रकल्पाची वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरावस्था, वाहतुकीचा ताण आणि परवाण्याचा गैरवापर यामुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ठाणेदार व तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
– गोंडपिपरी-खेडी मार्गावरून होणारी सुरजागडची वाहतूक तत्काळ थांबवावी.
– वाहतूक परवान्याचा होत असलेला दुरुपयोग रोखावा.
– रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
– सदर मार्गावर सुरक्षा निर्माण करावी….
शिवसेनेचा इशारा
– आठ दिवसात उपाययोजना न केल्यास आंदोलन उभारले जाईल.
– नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र लढा उभारला जाईल.








