वीज पडून कान्होली येथील युवकाचा मृत्यू तर एक जखमी…

353

जखमी वर ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे उपचार सुरु.

प्रतिनिधी गौरव बुरांडे 
चामोर्शी:-
दि. 11 सप्टेंबर गुरुवार ला जिल्ह्यात वीज पडण्याची दाट शक्यता आहे. SDMA च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा असे सांगणारा तसेच स्थानिक सरकारी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका अश्याप्रकारे सतर्क करणारा मॅसेज संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईल वर मिळालेला होता मात्र शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने त्याला संकटाचा सामना करावाच लागतो म्हणून चामोर्शी तालुक्यातील कान्होली या गावात सायंकाळी ४ च्या सुमारास मेघगर्जना सह मुसळधार पावसाने हजेरी लावली असताना दरम्यान निसर्गाच्या नियतीने डाव साधला. आपल्या शेतात धानाला रासायनिक खत देण्यासाठी ५ ते ६ मजुर घेऊन शेतात गेलेला शेतकरी सुरज मनोहर देशमुख हा जोरदार येणाऱ्या पावसामुळे कामात व्यतय आल्याने होत असलेल्या विजांच्या कडकडाट बघून आपल्या मजुर सोबत्यासह घरी परत येण्याच्या तयारीत असताना अचानक त्याच्या वर विज कोसळल्याने तो शेतातील बांधावरुन खाली कोसळला. त्याच्या मागेच साथीला असलेला मजुर दिपक शेंडे हा सुद्धा जागीच कोसळुन पडला.
शित (थंड) विजेचा प्रकार असल्यामुळे दिपक शेंडे जागीच कोलमडून पडला गंभीर जखमी झाला. तर सदर प्रकार सोबतीने असलेल्या बाकी मजुरांच्या निदर्शनास येताच सगळे जणांनी एकच टाहो देत त्यांच्या मदतीला धावून गेले. विजेचा हादसा एवढा भयानक होता की दोघांची प्रकृती अवस्था बिकट असलेले बघून भ्रमणध्वनी द्वारे घरी सदर घटनेची माहिती देताच आप्तपरीवारासह गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. दोघांची प्रकृती चिंताजनक बघून ताबडतोब ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल करण्यात आले.
रूग्णालयात गंभीर जखमीवर प्राथमिक उपचार करून सुरज ची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. परंतु विजेचा आघात एवढा मोठा होता की नियतीच्या समोर अखेर मृत्यूशी झुंज देत सुरज मनोहर देशमुख याची प्राणज्योत मावळली. शेतमजूर दिपक शेंडे यांच्या वर ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटनेमुळे कान्होली गावात शोककळा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.