पुल तुटल्याने गरंजी गाववासीयांचा जीव मुठीत धरून प्रवास नवीन पूल बांधण्याची गरंजी गावासीयांची मागणी

89

नवीन पूल बांधण्याची गरंजी गावासीयांची मागणी

प्रतिनिधी गौरव बुरांडे/घोट:
रेगडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गरंजी गाव अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. गरंजी हे गाव चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभाग २ मध्ये समाविष्ट आहे.
गरंजी हे गाव रेगडी पासून सुमारे बारा किमी अंतरावर हे गाव वसलेला आहे.
भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष लोटून चालले आहे; परंतु
अजूनहीया गावाला बारमाही जाण्यासाठी नदीवर पूल बनवलेला नाही.
गरंजी गावात जर तुम्ही जात असाल तर गावात पोहतांना तुम्हाला जिव हातात घेऊन गावात प्रवेश करावा लागणार.
गावापासून केवळ तीनशे मीटर अंतरावर असलेल्या एका पुलाची इतकी बिकट परिस्थिती आहे की येथील गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन ये – जा करवा लागत आहे.
गरंजी येथील गावकरी अनेकदा या पुलाची बांधकाम करण्या बाबत शासनाकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे;
परंतु शासनाने याची कोणतीच गंभीर दखल घेतली नसून
गरंजीचा विकास येथे थांबला आहे.
आता तरी शासन प्रशासन या गंभीर प्रश्नावर लक्ष देणार का? स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न गावकऱ्यां समोर उभा ठाकला आहे.
लवकरात लवकर गरंजी गावालगत असलेल्या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधण्यात यावी अशी मागणी गरंजी येथील नागरिक करत आहेत.