जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीला घेऊन गडचिरोलीत सर्वपक्षी धरणे आंदोलन…

125

प्रतिनिधी गौरव बुरांडे

गडचिरोली:
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, संवेदनशील आणि मागास जिल्ह्यातील जनतेवर अशा दडपशाही स्वरूपाच्या कायद्याचा विपरित परिणाम होईल. स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सामान्य नागरिक यांच्यावर अवाजवी पोलीस नियंत्रण येईल. विरोधी मत मांडणाऱ्या लोकांना अन्यायकारक कारवायांचा सामना करावा लागेल. या विधेयकामुळे नागरिकांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली होणार असून, हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. यामुळे महाराष्ट्रात पोलिसी राजवट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४”  तत्काळ रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, भाकप नेते डॉ. महेश कोपूलवार, अ. भा. रिप. पक्ष केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हा सचिव भाकप देवराव चवळे, सीपीएम अमोल मारकवार, आजाद समाज पार्टी राज बन्सोड, ऍड. कविता मोहरकर, महिला जिल्हाध्यक्षा काँग्रेस कमिटी,
हंसाराज उंदीरवाडे, भारत जांभुळकर, नरेंद्र रायपुरे, सचिन मोतकूरवार, सुरज जपकुलवार, कुणाला कोवे, शिवाजी नरोटे, विलास निंबोरकर, सतीश विधाते, वसंत राऊत, प्रशांत कोराम, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, प्रभाकर कुबडे, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, प्रफुल आंबोरकर, श्रीनिवास ताटपल्लीवर, गैरव येनप्रेडीवार, गुरुदेव भोपये, बाळकृष्णजी सावसागडे, उमेश आखाडे, अजय भानारकर, स्वप्नील बेहरे, भास्करजी इंगळे, देवेंद्र बांबोळे, संतोष कोटकर, देवराव रोहणकर, विनोद सुदा, तुकाराम मडावी, तुळशीराम मोहुर्ले, उपेंद्र रोहणकर, दिवाकर साखरे, नामदेव पोले, केशवराव सातपुते, प्रभाकर कोटरंगे, सुखदेव जेंगठे, हेमंत सहारे, नरेंद्र उंदीरवाडे, अविनाश तुरे, प्रकाश दुधे, सुखदेव वासनिक, नरेंद्र रायपुरे, सौं. कविता उराडे, सौं. कल्पना नांदेश्वर, सौं. अपर्णा खेवले, सौं. अशा मेश्राम, सौं. रिता गोवर्धन, सौं. सुनीता रायपुरे, सौं. कल्पना संगेवार, सौं. प्रभा भांडेकर सह
काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), बहुजन समाज पार्टी (BSP), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM), आजाद समाज पार्टी तसेच आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.