धानोरा येथे कोतवालांचा आंदोलन–समस्यांचे तहसीलदाराना दिले निवेदन…

102

प्रतिनिधी गौरव मोहबे

कोतवालांना चतुर्थी श्रेणी वेतनश्रेणी मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने 10 सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

कोतवाल अर्थात महसूल सेवक हा महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शासकीय राज्य/ केंद्र शासनाचे ध्येय धोरणे, उपाययोजना,विविध योजना, मोहिमांचे समन्वय,आपत्ती व्यवस्थापन टंचाई,जनगणना,निवडणुका विविध प्रमाणपत्रे देणे, अशा अनेक बिगर महसुली शासन स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत प्रामाणिक पणे राबविण्याचे काम महसूल सेवक अर्थात कोतवाल करीत आहेत. परंतु त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यांना तुटपुंज्या मानधनावर 24 तास काम करावे लागते आहे.

शासनाने यापूर्वी कोतवालांना चतुर्थी श्रेणी वेतनश्रेणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आंदोलन करीत आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार 10 सप्टेंबर ला काळी फीत लावून काम करणे, 11 सप्टेंबर ला एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन करणे व 12 सप्टेंबर ला महसूल मंत्री यांचे आवारात आंदोलन तथा साखळी उपोषण करणे.

अशा प्रकारे आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी धानोरा महसूल सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष आशिष पोरेटी उपाध्यक्ष यशपाल टेंभूर्णे सचिव महेश वलादे व धानोरा तालुक्यातील सर्व कोतवाल उपस्थित होते.