लाईटचा वापर ! पोलिसांच्या आदेशाकडे डीजे चालकांचे सपशेल दुर्लक्ष
प्रतिनिधी गौरव मोहबे:
चंद्रपूर – चंद्रपुर जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला गणेश मूर्ती विसर्जन वेगवेगळ्या तारखेला आयोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होतात मात्र यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला आहे. मुख्य मार्गावर स्ट्रीट व हायमास्ट लाईट बंद आहे. आणि विशेष बाब म्हणजे २१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांनी लेझर लाईट वापरावर प्रतिबंध असल्याचा आदेश निर्गमित केला होता, त्या आदेशाला डीजे चालकांनी केराची टोपली दाखवली आहे.
गणेश विसर्जनाच्या पूर्व संध्येला चंद्रपुरात युवकाची भाईगिरी, चाकू काढत नागरिकांना धमकी
मानवी जीविताला धोका, आरोग्य, सुरक्षितता व गोंधळ सह भांडणे निर्माण करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने मिरवणुकीत लेझ लाईट वापरास प्रतिबंध केला असा आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला होता. मात्र गणेश उत्सवाच्या धामधुमीत डीजे चालकांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर केलाच. Violation of Chandrapur police order