मुख्य संपादक प्रशांत शाहा
नागपूर:०६ सप्टेंबर २०२५
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि कलागुण अबाधित व जिवंत राहावेत या उद्देशाने राज्यस्तरीय “बिरसा कला संगम” या आदिवासी कलागुण संपन्न स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत आज नागपूर येथील रविभवन येथे विस्तारित बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीचे नेतृत्व माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केले. बैठकीच्या समारोपावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नेते म्हणाले की, “भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी देशभरात ‘जनजाती गौरव दिन’ साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आदिवासी समाजातील संस्कृती आणि कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी ‘बिरसा कला संगम’ राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. विदर्भातील सर्व आदिवासी समाजबांधवांनी एकत्रित येऊन या उपक्रमाला हातभार लावावा.”
या बैठकीत विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी भगवान बिरसा मुंडा ला संगम चे प्रदेश समन्वयक स्वप्नील चौधरी, महाराष्ट्र सेंट्रल नॉलेज प्रमुख विरेंद्रजी चपानेरकर, विदर्भ प्रमुख कमलेशजी भगतकर, आदिवासी आघाडी प्रदेश सोशल मीडिया प्रमुख अक्षय उईके, गडचिरोली येथील माजी सभापती तथा आदिवासी नेत्या रंजिताताई कोडाप, पल्लवी बारापात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सहभागी झालेल्या सर्व समाजबांधवांचे डॉ. नेते यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय बिरसा कला संगम स्पर्धेत सक्रीय सहभागासाठी आवाहन केले.







