वनसडीच्या तरुणांचा भाजपात पक्षप्रवेश…

208

ग्रामविकासासाठी पुढे येण्याचे आमदार देवराव भोंगळे यांचे आवाहन.

संपादक प्रशांत बिट्टूरवार

राजुरा, दि. ३१
कोरपना तालुक्यातील वनसडी येथील अनेक तरुणांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा आज सकाळी राजुरा येथील आमदार भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी ग्रामविकासाकरता तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन केले. “युवाशक्ती ही कोणत्याही गावाच्या विकासाचा पाया आहे. तरुणांनी राजकारणात आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो,” असे ते म्हणाले.
वनसडी येथील तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश करून योग्य पाऊल उचलले असून, त्यांच्या माध्यमातून गावात विकासाचे नवीन पर्व सुरू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या नवप्रवेशितांमध्ये महेश्वर कोल्हेकर, अजित उरकुडे, अमर, अनिकेत आंबेकर, विठोबा श्रीरसागर, गणेश आत्राम, गौरव, स्नेहंकित डाखरे, प्रतिक पिंपळकर, प्रणय महाकुलकर, विश्वजित सोनटक्के , पंकज वाढई, गोपाल खोके, रोहन कोल्हेकर, वैभव पिंपळकर, हर्षल नक्षीने, करण आक्कूलवार, हर्षल पिंपळकर, भालचंद्र थेरे, वैभव खोके, मोरेश्वर उरकुडे, गणेश उरकुडे, शुभ्रतो पिंपळकर, पवन वाढई, वैभव सोनपित्रे, रंजित सोनटक्के, सुरज सोनटक्के, सुरज वेट्टी, श्रीकांत कावडकर आणि चेतन कावडकर यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेशावेळी तालुका उपाध्यक्ष पुरूषोत्तम भोंगळे, जगदीश पिंपळकर, अजय मुंगीलवार, प्रमोद पायघन, सुधाकर ताजणे, धम्मकिर्ती कापसे यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.