काँग्रेस नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मातोश्रींना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली…

114

प्रतिनिधी नितेश खडसे

गडचिरोली :३१ ऑगस्ट २०२५
आई म्हणजे प्रेम, माया, त्याग आणि कुटुंबाचा खरा आधारस्तंभ. अशा या मातृस्वरूप व्यक्तिमत्त्वाचा सहवास हरवणे ही प्रत्येकासाठी अपूर्ण होणारी हानी असते. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार मान. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मातोश्री स्व. कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांच्या निधनानंतर त्यांचा चौदावा कार्यक्रम गडचिरोली येथील आर.के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड,गडचिरोली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या दुःखद प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. श्री. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून मातोश्रींना विनम्र श्रद्धांजली वाहिली.

श्रद्धांजली व्यक्त करताना डॉ. नेते भावुक होत म्हणाले –
“आई ही प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणेचा झरा असते. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी शब्दांनी भरून निघत नाही. मातोश्री कमलाबाई यांचे आयुष्य हे त्याग, संस्कार आणि मूल्यांनी परिपूर्ण असे होते. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो व वडेट्टीवार परिवाराला या दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.”

या श्रद्धांजली कार्यक्रमाला यावेळी कि.मो.प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,सहकार आघाडी चे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,सुनिल पोरेड्डीवार, सतिश पवार,प्रमोद पुण्यपवार यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली.

“आईच्या आठवणींचा सुवास कायम मनामनात दरवळत राहील…” 🙏