किसनराव खोब्रागडे स्मृती प्रित्यर्थ नागरी सत्कार…

82

प्रतिनिधी सतीश कुसराम:

आरमोरी: किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी आरमोरी व यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय लाखांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्री. किसनराव खोब्रागडे स्मृती प्रित्यर्थ सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवर मंडळी, आचार्य प्राप्त प्राध्यापक व विद्यापीठ परीक्षेत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे प्रमुख पाहुणे भाग्यलक्ष्मी खोब्रागडे संस्थेचे उपाध्यक्ष सुशील खोब्रागडे प्राचार्य डॉ.जे.व्हि.दडवे उपप्राचार्य डॉ.प्रा. पी.एम. ठाकरे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष दुर्योधन भागडकर लाखांदूर लोकमतचे वार्ताहर प्रा. प्रदीप वैरागड प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन मेश्राम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग सोनकर, देविदास नैताम आरमोरी, माजी पं. स. सभापती शांता तितरमारे चोप, वैशाली वासेकर लाखांदूर, रजनी वैद्य मांगली, इंदिरा धावडे विरली (बु) मराठी विषयात आचार्य पदवी प्राप्त प्रा.भोजराज बोदेले रसायनशास्त्र शास्त्रात आचार्य पदवी प्राप्त शैलेश भगत व विद्यापीठ परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे म्हणाले समाजात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात काही व्यक्तींचा मोलाचा योगदान असते त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना शाबासकी मिळावी सन्मान मिळावा या उद्देशाने स्व. किसनराव खोब्रागडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार देऊन समाजातील मान्यवर मंडळीचा सत्कार करण्यात आम्हाला संधी मिळते व व सत्कार स्वीकारणाऱ्यांना आपल्या क्षेत्रात अधिक चांगले कार्य करावे यासाठी प्रेरणा मिळते. .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. व्हि.दडवे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. वीरेंद्र तुरकर यांनी केले आभार प्रदर्शन डी. एन. लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व विद्यापीठ सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.