गडचिरोलीत संघाच्या पत संचालन शिबीरात शिस्त, देशभक्ती व ऐक्याचे दर्शन; मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते स्वयंसेवकांचा गौरवपूर्ण सन्मानाने स्वागत…

99

प्रतिनिधी सतीश कुसराम/
गडचिरोली : दि. ३१ ऑगस्ट २०२५
गडचिरोली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सात दिवसीय पत संचालन शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरानंतर झालेल्या पतसंचलनाच्या भव्य रॅलीने गडचिरोली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले. रॅली इंदिरा गांधी चौकात पोहोचताच स्वयंसेवकांचे भव्य स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते स्वयंसेवकांवर फुलपुष्पांचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या सोबतच गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जेष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार, जेष्ठ नेते गजानन येंगदलवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, माजी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री विनय मडावी, अनिल करपे अविनाश विश्रोजवार,विनोद देवोजवार, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांचे मनापासून स्वागत केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पत संचालन शिबिरामुळे गडचिरोली शहरात देशभक्तीचे, शिस्तबद्धतेचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. रॅलीदरम्यान स्वयंसेवकांनी केलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.