राजुरा गडचांदुर मार्गावर भीषण अपघात सहा ठार….

402

*📍कापणगाव अपघात मन हेलावून टाकणारी घटना : माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली चिंता.*
*🟠 मृतकांच्या कुटुंबियांना धीर देत प्रशासनावर साधला निशाणा*

*🔴 ६ ठार – २ गंभीर जखमी*

प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर:

राजुरा: राजुरा-गडचांदूर मार्गावरील कापणगाव येथे झालेल्या भीषण अपघातात हायवा ट्रकने आटोला दिलेल्या धडकेत ६ निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे धाव घेऊन मृतकांच्या कुटुंबीयांना धीर दिला व जखमींच्या उपचाराबाबत माहिती घेतली.

यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच रराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रील कंपनीकडुन मृतकांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर सुभाषभाऊ धोटे यांनी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत प्रशासनावर संताप व्यक्त करताना म्हटले की, “प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. स्थानिक जनतेमध्ये या निष्काळजीपणाबद्दल तीव्र असंतोष आहे. आता तरी ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा आक्रोश उफाळून येईल असा इशारा दिला.”*