खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सडक परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची घेतली भेट…

166

प्रतिनिधी/सतीश कुसराम:

दिनांक २१ऑगस्ट:

नई दिल्ली येथील संसदेतील कार्यालयात लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सडक परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन गडचिरोली-चिमुर लोकसभेतील प्रलंबित राष्ट्रीय महामार्गसंदर्भात चर्चा केली व नागभीड ते उमरेड, देवरी ते कोरची-कुरखेडा-वडसा ते आरमोरी ते गडचिरोली तसेच आष्टी ते आलापल्ली, अहेरी ते सिरोंचा या महामार्गांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मागणी केली. तसेच कोरची रोड वरील पुराडा ते झनकारगोंदी या 12 कि. मी. घाटातील महामार्गाचे साईड सोल्डर काँक्रेटीकारण, पक्की गटारे व संवरक्षण भिंत करण्याची मागणी केली.*