*जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर*…

289
Breaking News label banner isolated vector design

*जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर*

प्रतिनिधी/सतीश कुसराम:

गडचिरोली दि .२१: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि १०२ पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार ही अंतिम प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर आणि जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर, जिल्हा परिषद कार्यालयातील सूचना फलकावर, सर्व तहसीलदारांच्या कार्यालयांतील सूचना फलकांवर आणि सर्व पंचायत समित्यांच्या कार्यालयांतील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजीत प्रधान यांनी कळविले आहे.