अहेरीत धर्मरावबाबा आत्राम यांचा 16814 मताधिक्याने विजय.

778

अहेरी :- राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा च अहेरी विधानसभा क्षेत्रातवडील मुलगी आणि पुतण्या अशी अहेरीच्या राजघराण्यातलढत रंगली होती. त्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजीपालकमंत्री अंबरीश राव आत्राम यांना 16814 पेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा विजय साजरा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मैदानातअसलेल्या भाग्यश्री आत्राम ह्या तिसऱ्याक्रमांकावर राहिल्या.

पहिल्या फेरीपासूणच धर्मरावबाबानी आपले मताधिक्य कायमठेवले होते शेवटच्या फेरीपर्यंत आपली विजयी आघाडी कायमठेवून विजय संपादन केला.हा आपल्या विकासकामांचा व जनतेनी दिलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विजयानंतर आलापल्ली व नागेपल्ली मध्ये विजयी रॅली फटाके फोडून नाचून महायुती च्या कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला.