फारेस्ट ग्राउंड मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

219

आलापल्ली :

आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आल्लापल्ली येथील फारेस्ट ग्राउंड(क्रिडा संकुलंन) या ठिकाणी आज ठीक ७:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत आल्लापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम व सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके,मनोज भाऊ बोलूवार ,पुष्पा ताई अलोणे व सर्व ग्रां. प. सदस्य उपस्थित होते. तसेच आल्लापल्ली चे उप वनसंरक्षक श्री. राहूलसिंह टोलिया तसेच ग्रामविकास अधिकारी मस्के साहेब , आलापल्ली रुग्णालय येथील डॉ. उईके मॅडम उपस्थित होते. तसेच आज क्रिडा संकुलंन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या मध्ये आल्लापल्ली येथील शाळेचे विद्यार्थी या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतले व सर्व शाळकरी विद्यार्थी उत्कृष्ट असे सुंदर नृत्य केले आणि त्या नंतर आल्लापल्ली मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वराज्य फाउंडेशनचे आज सत्कार करण्यात आले.
स्वराज्य फाउंडेशन ग्रामीण भागातील शोषित, पीडित, वंचितांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्याबद्दल स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली सामाजिक संस्थेच्या सदस्यांचा आलापल्ली ग्रामपंचायत तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या एक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरजू लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा ग्रामीण आणि पुर – परिसथितीत लोकांना तात्काळ मदत अशी अनेक सामाजिक कामे स्वराज्य फाउंडेशन माध्यमातून केली जात आहेत. ग्रामीण भागातील जनसामान्य जनतेसाठी स्वराज्य फाउंडेशन देवदूत ठरले आहे तसेच स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष सागर रामगोनवार यांनी गेल्या काही वर्षांपासून ३५ वेळा रक्तदान केले तसेच दीप कानाबार यांनी ३१ वेळा रक्तदान केले. त्यांचा कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उप वन संरक्षक टोलिया साहेब ,ग्रामविकास अधिकारी मस्के साहेब , आलापल्ली रुग्णालय येथील डॉ. उईके मॅडम, आलापल्ली ग्रा. प.सरपंच शंकर भाऊ मेश्राम व ग्रापंचायत सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके,मनोज भाऊ बोलूवार ,पुष्पा ताई अलोणे व सर्व ग्रां. प. सदस्य उपस्थित होते.