श्याम म्हाशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)
चंद्रपुर-:संपुर्ण महाराष्ट्रात तसेच विशेष करून *विदर्भातील शेतकरी राजाला येणार्या अतिपाऊसामुळे चांगलेच आर्थिक अडचणीत टाकलेले आहे.* खरीप हंगामात त्याने शेतात गुंतवलेला पैसा त्याला उत्पन्नाच्या रूपाने परत मिळणार नाही आहे. तसेच पीक विमा कंपन्या सुद्धा शेतकऱ्यांना कुठेही मदत करतांना दिसत नाहीत.अशा परिस्थितीत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. जर त्यांची मदत झाली नाही तर *शेतकरी राजाची दिवाळी ही पूर्ण अंधारात जाईल तसेच त्याला समोरील रब्बी हंगामातील पिकांच्या तयारीसाठी सुद्धा त्यांच्या कडे आर्थिक पर्याय राहणार नाही.आणि अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल होऊन कुठलेही पाऊल उचलण्यास बाध्य होऊ शकतो. म्हणून आम्ही आम आदमी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे जिल्हा पालकमंत्री, राज्याचे कृषिमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो आहे की,जेव्हा *आम आदमी पार्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी रुपये ५०,००० देऊ शकते तर महाराष्ट्र शासन का नाही ?* दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी लख्ख प्रकाशात साजरी व्हावी व त्यांच्या येणाऱ्या रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी रुपये ५०,००० एवढी आर्थिक मदत करण्यात यावी. अशी अपेक्षा करतो आहे.
*पण जर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना याबाबत दिवाळी आधी काहीही आर्थिक मदत दिली नाही तर,आम्ही नाईलाजाने त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना लक्ष्मीपूजनाचे दिवशी बेशर्माचे झाडाच्या फांद्या दिवाळी शुभेच्छा म्हणून देण्यासाठी त्यांचे कार्यालयात जाऊन देऊ व अशा नाकर्त्या सरकारचा जाहीर निषेध करू.या सर्व प्रकारास शासन जिम्मेदार राहील याची नोंद घ्यावी. *असा इशारा आम आदमी शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख श्री सुनील रत्नाकर भोयर यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे शहर सचिव श्री राजू शंकर कुडे; सहसंयोजक श्री योगेश आपटे; महिला आघाडी संयोजक श्रीमती ऍड सुनीता पाटील; जिल्हा कोषाध्यक्ष श्री भिवराज सोनी;झोन अध्यक्ष श्री रहेमान खान जी पठाण ;सहसचिव श्री अजय डुकरे; शेतकरी श्री भुवनेश्वर निंमगडे; शेतकरी श्रीमती रिता हरिदास शिंदे;घुग्गुस तालुका अध्यक्ष श्री अमित बोरकर; श्री अभिषेक राजेश सपदि घुग्गुस ; श्री विकास खाडे;श्री महेशसिंग (प्राजी) पवार ; श्री लक्ष्मण पाटील साहेब; श्रीमती सुहानीजी दुर्योधन आणि श्री सुभाष दुर्योधन जी इत्यादी पदाधिकारी/कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.






