खळबळजनक: गडचिरोलीत नळाच्या पाईप लाईन मध्ये आढळला तरुणाचा मृतदेह…

2400

गडचिरोली: शहरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.गडचिरोली शहराच्या चामोर्शी रोड वरील ( वृदाश्रमजवळील ) पाण्याच्या टाकीमध्ये एका 35 वर्षीय वयोगटातील मनोरुग्ण तरुणाने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

मृत झालेल्याचे नाव (योगेश शेषराव देवोजवार वय 35 वर्ष ) तो अविवाहित होता, त्याचे मृतदेह चामोर्शी रोडवरील एका पाणी सोडण्याच्या वॉल मध्ये सापडला त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली. दुपारी दोन च्या सुमारास मृतदेह हा पाण्याच्या एका वॉल मधुन काढण्यात आला.मृतदेह कुजक्या अवस्थेत सापडला. तरुन हा मनोरुग्ण असल्याने आत्महत्या केली.मृतदेह कुजक्या अवस्थेत सापडल्याने त्याने आत्महत्या दोन दिवसापुर्वी केली असावी असा अंदाज आहे, नगर परिषद सफाई कामगारानी त्याचा मृतदेह त्या वॉल मधुन काढला व पोलीसांनी पंचनामा करुन उत्तरीय तपासणी करीता जिल्हा सामाण्य रुग्णालयात गडचिरोली येथे पाठविण्यात आला आहे.
मृत झालेली व्येक्ती आपल्या आई , वडिलांसोबत राहत होता.व त्याच्या तीन मोट्या बहिणीचे विवाह झाले आहे.