Home Breaking News दोन दिवसीय खबड्डी सामन्यात ६० किलो वजनी गटात मराठा वॉरियर्स कोंढा तर...

दोन दिवसीय खबड्डी सामन्यात ६० किलो वजनी गटात मराठा वॉरियर्स कोंढा तर ५५ किलो वजनी गटात श्रीराम बालक आखाडा लाठीचा संघ अव्वल…

606

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी)

श्रीराम बालक आखाडा लाठी यांच्यावतीने 60 किलो आणि 55 किलो या दोन वजनी गटांतील दोन दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते ..या सामन्यांसाठी जिल्हाभरातून तब्बल पन्नास हून अधिक संघ दाखल झाले होते. .कबड्डी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात चाललेल्या या दोनदिवसीय कबड्डी या स्पध्रेत 60 किलो वजनी गटाच्या अतिशय रोमहर्षक आणि अटीतटीच्या झालेल्या लढतीत मराठा वॉरियर्स कोंडा या संघाने विजयाचा मान पटकावला. तर श्रीराम बालक आखाडा लाठी हा संघ द्वितीय तसेच विठ्ठल रखुमाई क्रीडा मंडळ तोहोगाव हा संघ तृतीय ठरला ,त्याचसोबत 55 किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात यजमान श्रीराम बालक आखाडा लाठी हा संघ विजयाचा मानकरी ठरला तर मराठा वॉरीयर्स कोंडा हा संघ द्वितीय आणि जयसेवा क्रीडामंडळ पारडी या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. . दोन्ही गटातील विजयी संघांना अनुक्रमे 16000 11000, 6000 रोख रक्कम आणि सन्मान चषक देऊन गौरविण्यात आले. . या कबड्डी सामन्यांच्या बक्षीस वितरणप्रसंगी गटग्रामपंचायत लाठीचे सरपंच विनोदजी जगताप पोलीस उपनिरीक्षक अमोलजी ठमके उपसरपंच साईनाथ भाऊ कोडापे सुनील भाऊ चावरे ,प्रदीपजी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. . या दोन दिवसीय कबड्डी स्पध्रेच्या समालोचनाची यशस्वी धुरा विशाल जी गेडाम आणि रत्नाकरजी पाल यांनी पार पाडली . . श्रीराम बालक आखाडा लाठी चे अध्यक्ष प्रवीण एकोणकर आणि स्वप्नील आस्वले यांच्या मार्गदर्शनात यजमान संघाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेत या दोनदिवसीय कबड्डी सामन्याचे यशस्वीरीत्या आयोजन केले . याबद्दल कबड्डी रसिक आणि ग्रामस्थांकडून मंडळाचे कौतुक केले जात आहे

Don`t copy text!