Home Breaking News पानोरा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील बोरकुटे तर उपाध्यक्षपदी दिवाकर मंडरे बिनविरोध

पानोरा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील बोरकुटे तर उपाध्यक्षपदी दिवाकर मंडरे बिनविरोध

397

गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील सालेझरी गावचे धुरंदार सरपंच श्री. राजूभाऊ राऊत यांचे नेतृत्वात गाव परिसरातील सालेझरी, राळापेठ, पानोरा या सेवा सहकारी सोसायटी ची नुकतीच निवडणूक पार पडली.

यात सरपंच राजू भाऊ राऊत यांचे नेतृत्वात काँग्रेसप्रणित सदस्य बहुमताने निवडून आले. त्यातच आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी श्री.सुनील बोरकुटे तर उपाध्यक्षपदी श्री. दिवाकर मंडरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पानोरा येथील सेवा सहकारी संस्थेवर निवड झालेल्या नवनिर्वाचित विजयी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन..!
कार्यकारिणी निवड झालेली नवनिर्वाचित कमिटी खालील प्रमाणे…..

१) श्री. सुनील मारोती बोरकुटे (अध्यक्ष)
२)श्री. दिवाकर जनार्धन मंडरे (उपाध्यक्ष)
३)श्री. प्रभाकर कवडु राऊत सदस्य
४)श्री. बालाजी राघो बोरकुटे सदस्य
५)श्री. घनशाम काशिनाथ गुडी सदस्य
६) श्री. शांताराम शिवराम भस्की सदस्य
७)श्री.प्रकाश झित्रुजी तारोडे सदस्य
८)सौ. सुमनबाई गिरमा रोहनकर सदस्य

पानोरा सेवा सहकारी संस्थेवर निवड झालेल्या समस्त काँग्रेस प्रणित नवनिर्वाचित सभासदांचे हार्दिक अभिनंदन

Don`t copy text!