Home Breaking News राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदी दीपक खोब्रागडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदी दीपक खोब्रागडे यांची नियुक्ती

588

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेले तसेच २०१४ ते २०१९ पक्षाची सत्ता नसताना देखील पक्षाची बाजू भक्कमपणे संभाळणारे, वेळोवेळी भाजपा शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे दीपक खोब्रागडे हे राज्यातील धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे नातू असून नागभिड तालुक्यांतील नांदेड या गावतील रहिवासी आहे.

सदर नियुक्ती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. मेहबूब भाई शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली.
सदर नियुक्ती मुळे नागभिड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Don`t copy text!