Home Breaking News चंद्रपूर मनपातही घडणार चमत्कार? महाविकास आघाडीतील काँग्रेस, राकॉं, शिवसेना मित्रपक्षांची बैठक..

चंद्रपूर मनपातही घडणार चमत्कार? महाविकास आघाडीतील काँग्रेस, राकॉं, शिवसेना मित्रपक्षांची बैठक..

850

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात सरकार उदयास आले. यातून सत्तेचा माज आलेल्या भाजपला या तिन्ही पक्षांनी चांगलाच धडा शिकविला. चंद्रपूर महानगरपालिकेतही भाजपची सत्ता आहे. चंद्रपूरकरांच्या हिताऐवजी येथील सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वहित साधण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे मनपातील भाजप सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हाकलून लावण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राकॉं, शिवसेना या मित्रपक्षांची बैठक पार पडली. यावेळी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे उपस्थित होते…..

Don`t copy text!