राजपूर पँच येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन..जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते..!!

286

विजय तोकला, सिरोंचा तालुका प्रतिनिधी

अहेरी :- अहेरी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय राजपूर पँच येथे ० ते ६ वयोगटातील चिमुकल्या बाल गोपालांना शिक्षणाचे धडे गिरवीता आले पाहीजे या करीता अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले मात्र हि इमारत जिर्ण अवस्थेत असल्याने चिमुकल्या बाल गोपालांच्या जिवास धोका होण्याची शक्यता होती या करीता अंगणवाडी इमारतीचे निरलेखन करून सदर प्रस्ताव *जि.प. अध्यक्ष श्री अजय कंकडालवार* यांच्या कडे पाठवण्यात आले सदर प्रस्तावाचे दखल घेऊन अजय कंकडालवार यांनी चिमुकल्या बाल गोपालांना नवीन इमारती मध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या करीता जिल्हा वार्षिक योजनेतून ११ लाख २८ हजार रुपये मंजूर केले व आज दि.११/०६/२०२१ रोज रवीवार ला नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन *जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजय कंकडालवार* यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुनीता कुसनाके, पंचायत समिती सभापती श्री भास्कर तलांडे, पंचायत समिती सदस्या सौ.छाया पोरतेट,राजपुर पँच ग्रामपंचायतीचे सरपंचा सौ.मिना वेलादी,उपसरपंचा सौ.सविता कोकीरवार ग्रा.पं.सदस्य सौ.ज्योती
तलांडे,सौ. सुमित्रा वासेकर श्री मधूकर वेलादी, श्री सुरेश गंगाधरीवार,श्री शंकर सिडाम, संतोष पंदीलवार, ग्रामपंचायत राजपूर पँच चे सचिव आर.के.कोडाप,बोरी ग्रामपंचायतचे सदस्य महेश सेडमाके, श्री पांडुरंग रामटेके, श्री विजय कोकीरवार,शेखर पुल्लीवार, प्रविण शेंडे, मुक्तेश्वर गंगाधरीवार,राजेश गंगाधरीवार प्रशांत गोडशेलवार तसेच राजपूर पँच येथील समस्त गावकरी नागरीक उपस्थित होते