असाही योगायोग…शिवसेनेच्या प्रथम तालुका अध्यक्षाच्या पत्नीचे शिवजयंतीला निधन…

800

-नागेश इटेकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

आयुष्यातल्या ज्या गोष्टी भाग्यानुसार घडत असतात, त्यांना आपण योगायोग म्हणतो.
रोजच्या जीवनात अपेक्षित असलेल्या घटना बहुतेक वेळा ठरल्यानुसार घडत असतात. त्यांना योगायोग म्हणायची गरज नाही. पण कधीकधी जीवनाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळते. अशीच एक घटना गोंडपिपरी येथील शिवाजी वार्डातील रहिवासी असलेले झाडे कुटुंबियांच्या बाबतीत घडलं आहे.

जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष स्थापन झाला तेव्हा गोंडपिपरी तालुक्यातील स्व.भास्कर झाडे यांची सर्व प्रथम गोंडपिपरी तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्या काळात तालुक्यात शिवसेनेचं वर्चस्व तर नाहीच थोडी हवा सुद्धा नव्हती अशा काळात भास्कर झाडे हे “जय महाराष्ट्र ” हा बाळासाहेबांचा नारा उराशी जपत तालुक्यात शिवसेनेचं बिज रोवल. आणि हळुहळू शिवसेनेला तालुक्यात अंकुर फुटले.

भास्कर झाडे यांचा स्वर्गास होऊन बराच काळ लोटत आहे.ते गेल्या नंतर त्यांचा मुलगा सुद्धा शिवसेनेचा पदाधिकारी बनेल असे काहींना वाटू लागले पण त्या विचारांचे उलट निघाले मुलगा वडिलांच्या विचारानुसार चालु शकला नाही.भास्कर झाडे यांच्या विधवा पत्नीला त्याच्या भविष्याचा विचार पडला. मुलाच्या भविष्याच्या विचार करून कसेबसे संसाराचा गाडा समोर नेत असताना दिनांक १७-२-२०२१ ला मृत्युमुखी पडल्या.

*योगायोग बघा..*
पती जिल्हयात स्थापन झल्यापासून प्रथमतः गोंडपिपरी तालुका प्रमुख पदी नियुक्ती. भास्कर झाडे यांच्या पत्नीचा (लीलाबाई भास्कर झाडे) अंतिम संस्कार करण्यात आले शिव जयंतीला. नगर पंचायत अंतर्गत स्वर्ग रथ मंजुर करून सेवेत आणण्यात आले, आणि त्याचा लाभ सुद्धा सर्व प्रथम स्व. भास्कर झाडे यांच्या पत्नीलाच मिळाला ते पण शिव जयंतीच्या शुभ दिनी हा एक योगा योग नाही तर काय…!

स्व.भास्कर झाडे यांच्या जीवन चरित्राची अधिक माहिती गोंडपिपरी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. महेंद्रसिंह चंदेल यांना विचारली असता,शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला. जिवंत असे पर्यंत शिवाजी महाराजांच्या विचारसरणीत जगला, तालुक्यात शिवसेना पक्ष वाढविण्याचा दुरदृष्टीकोन ठेऊन निस्वार्थ कार्य केलं म्हणूनच हा योग झाडे कुटंबियांच्या नशिबी आले. असा योग नशीबवान लोकांनाच मिळतो असे इंडिया दस्तक न्युज टीव्ही शी बोलतांना सांगितले.