वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा…

841

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिलाय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.