चिमूर: ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळ अंतर्गत गृहिणींना घरबसल्या रोजगार कार्यक्रमाच्या अंतर्गत चिमूर तालुक्यातील कवडशी येथे सभा पार पडली. या सभेत प्रामुख्याने उमेद च्या सी आर पी. सौ.प्रतीक्षा तिवाडे मॅडम तसेच उमेद पंचायत समिती चिमूर च्या ब्रँच मॅनेजर तसेच ग्रामसंघाचे महिला पदाधिकारी महिला महामंत्री भाजपा चिमूर ज्योती ठाकरे मॅडम, ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाचे मा. श्री अशोकजी अंबागडे सर, सौरभ माद्यस्वार सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
गृहिणींना मार्गदर्शन करताना श्री अंबागडे सर असे बोलले की , आज देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तस तसा रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. नोकऱ्यांची मागणी व उपलब्धता यात मोठे अंतर निर्माण झाले आहे तरुण-तरुणीची धावपळ वाढत आहे कुटुंब प्रमुखाचे बजेट विस्कळीत झाले आहे. या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वयंरोजगार हाच पर्याय उरलेला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही उपजत कलागुण छंद असतात. त्यांचे रोजगारात रूपांतर झाले पाहिजे म्हणूनच ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळामार्फत गृहिणींना घरबसल्या रोजगार हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
Advertisements
ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…
Advertisements
Recent Comments
Advertisements
Advertisements