फिट इंडिया शाळा नोंदणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

0
199
Advertisements

शेखर बोनगिरवार जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : क्रिडा व युवक सेवा संचालनालयामार्फत सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांना त्यांची नोंदणी फिट इंडियाच्या पोर्टलवर करण्यासाठी दि. 10 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisements

फिट इंडिया चळवळी अंतर्गत विद्यार्थ्यांची तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीद्वारे प्राप्त झालेली माहिती खेलो इंडियाच्या ॲपवर अपलोड करावयाची आहे. शाळा नोंदणी बाबतच्या सविस्तर सुचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहे.

तसेच खेलो इंडियाच्या ॲपवर शाळेतील शारिरीक शिक्षण विषयाचे शिक्षक अथवा या विषयाचे शिक्षक नसल्यास मुख्याध्यापकांनी या कामासाठी नियुक्त केलेले शिक्षक यांनी आपली नोंदणी करावयाची आहे. शाळा एक शिक्षकीअसल्यास त्याच शिक्षकाने आपली नोंदणी करावी.

नोंदणी केल्यावर त्याबाबतचा अहवाल शिक्षणधिकारी व जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्याकडे सादर करावा. ज्या शाळा व शिक्षकांची नोंदणी यापूर्वी झालेली असेल त्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी क्रिडा अधिकारी यांचे कार्यालय यांच्याशी संर्पक साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here