Advertisements
Home चंद्रपूर विहित मुदतीत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करणार – राहुल कर्डिले

विहित मुदतीत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करणार – राहुल कर्डिले

शेखर बोंनगिरवार

Advertisements

चंद्रपूर, जे कंत्राटदार विहीत मुदतीत बंधाऱ्याचे काम पुर्ण करीत नाही अशा कंत्राटदाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असता जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) यांनी अशा कंत्राटदाराकडील एकुण 21 बंधाऱ्याचे बांधकामाचे करारनामे मागील दोन महिण्यात रद्द केलेले असून सुरक्षा ठेव व अनामत रक्कम शासनखाती जमा करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभाग, चंद्रपूर येथील सिमेंट प्लग बंधारे, को.प. बंधारे बांधकाम व दुरुस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. बांधकामाचे कंत्राट घेण्याकरीता कंत्राटदार, मजुर सहकारी सेवा संस्था, तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी बांधकामाचे कंत्राट मोठ्या प्रमाणात मिळविलेले असून करारनामा सुद्धा करण्यात आले होते. परंतु सदर बांधकामे विहित मुदतीत सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होत नाही व बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासुन वंचित राहावे लागत असुन शासनाचा शेतकऱ्याप्रती असलेला उद्देश सफल होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नाराजी व्यक्त केली होती.
करारनामे रद्द करण्यात आलेल्या कंत्राटदाराला यापुढे दोन वर्षाकरीता कामे घेता येणार नाही व भविष्यात अश्या प्रकारच्या पुनरावृत्ती झाल्यास कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जी कामे अद्यापही सुरु करण्यात आलेली नाहीत, अशा कंत्राटदारांना नोटीस तामील करण्यात आली असून मार्च 2021 अखेर पावेतो कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे कंत्राटदार दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करणार नाहीत अश्या कंत्राटदारांचे करारनामे रद्द करण्याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, (ल.पा.) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी कळविलेले आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

कोट्यावधींच्या विकास कामातून ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात…#माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित….#रस्ते ,सांडपाणी नाल्या, शुद्ध पेयजल योजना कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…

ब्रम्हपुरी: तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील गावखेड्यात दौरा करत असतात. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या...

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम

सावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...

कोट्यावधींच्या विकास कामातून ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात…#माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित….#रस्ते ,सांडपाणी नाल्या, शुद्ध पेयजल योजना कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…

ब्रम्हपुरी: तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील गावखेड्यात दौरा करत असतात. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या...

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!