कोरपना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १८१ नवीन प्रकरणांना मंजुरी…

0
137

गडचांदूर :-कोरपना तालुक्यातील निमणी येथील उपसरपंच उमेश राजूरकर यांची आमदार सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष म्हणून उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम बैठक संपन्न झाली.

Advertisements

या बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत ४१ श्रावणबाळ योजने अंतर्गत १०६ इंदिरा गांधी विधवा योजने अंतर्गत ६ इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेअंतर्गत २२ दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्पोटीत योजने अंतर्गत ६ अश्या १८१ प्रकरणांना मंजुरी प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापने नंतर सर्वच सरकारी समित्यांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्यानंतर प्रलंबित समित्यांच्या बैठकांना आता सुरवात झाली.

Advertisements

पहिल्याच बैठकीत जास्तीत जास्त प्रमाणात प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने दीर्घ काळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार विधवा वृद्ध अंध अपंग नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरपना निराधार समितीच्या बैठकीला अध्यक्ष उमेश राजूरकर पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर नायब तहसीलदार प्रवीण चिडे अशासकीय सदस्य मिलिंद ताकसांडे रेखा घोडाम प्रमोद पिंपळशेंडे विलास आडे अनिल निवलकर अब्दुल हाफिज अब्दुल गणी कल्पना निमजे सोहेल अली आदी उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here