Advertisements
Home चंद्रपूर निसर्गाची सर्वात मोठी व्यवस्था वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची गरज - आ. किशोर जोरगेवार

निसर्गाची सर्वात मोठी व्यवस्था वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची गरज – आ. किशोर जोरगेवार

 

पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ च्या वतीने

Advertisements

पर्यावरण प्रेमी व कोरोना योध्दांचा सत्कार

चंद्रपूर प्रतिनीधि/कैलास दुयाँधन

जिवन प्रणाली सुखद करण्याच्या नादात पसरत चालले तांत्रिकी जोळे पृथीवरील जिवसृष्टीसाठी घातक आहे. त्यामूळे आता याकडे गांभिर्यपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर त्यांचे संगोपणही केल्या गेले पाहिजे. पर्यावर प्रेमींकडून सातत्याने पर्यावरण वाचविण्याच्या दिशेने पर्यत्न केल्या जात आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून प्रकृतीची सर्वात मोठी व्यवस्था म्हणजेच पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची खरी गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आज रविवारी पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारा पर्यावरण प्रमीं व कोरोना योध्दांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आ. जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगर सेवक राजेंद्र वैद्य, डी. के.आरिकर, हिराचंद बोरकूटे, डॉ. भगत, राजेश सोलापन, शुभांगी डोंगरवार, डॉ. प्रसाद पोटदुखे, सुनील दहेगावकर, डॉ. देव कन्नाके, जगदीश लोणकर, प्रियदर्शन इंगळे, प्रा. अनिता वाळके यांची उपस्थिती होती आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आज पर्यावरचा अनेक ठिकाणी उद्रेक होत आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला निसर्गाचं व्यापक अस्तित्व मान्य करायला हवं, चंद्रपूरचा विचार केला असता हा वनसंपत्तीने वेढलेला जिल्हा आहे. असे असले तरी प्रदुषणाच्या बाबतीत या जिल्ह्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मागे सोडले आहे. त्यामूळे चिंतेसह आता चिंतन करण्याचीही गरज आहे. पर्यावरण प्रेमी पर्यावरण वाचविण्यासाठी झटत आहे. मात्र दुर्दैवाने त्यांची दखल घेतल्या जात नाही हे ही सत्य नाकारता येणार नाही. ही परिस्थिती बदलल्या गेली पाहिजे, चंद्रपूरातील पर्यावरण प्रेमींना शक्य ती सर्व मदत करण्याची आपली तयारी असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार यांनी बोलून दाखविले.

या कार्यक्रमात डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. आशिष जुलमे, डॉ. विद्याधर बन्सोड, रेखा खोब्रागडे, शिल्पा कोंडावार, निलम सुरमवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन… हजारो महिलांची उपस्थिती – मकरसंक्रांत निमित वाणाचे वितरण…

सिंदेवाही- महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी- कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राज्याच्या...

भारतीय समाज सेवा संस्थेचे कार्य अतुलनीय – माजी मंत्री वडेट्टीवार रौप्य

चंद्रपूर:  रौप्य महोत्सवानिमित्त आ. वडेट्टीवारांची मातोश्री वृद्धाश्रमाला भेट गेल्या पंचवीस वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका अंतर्गत येत असलेल्या विसापूर नजिकच्या मातोश्री वृद्धाश्रमाचा आज रौप्य महोत्सव पार...

स्वराज्य फाउंडेशन आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव..

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आलापल्ली : आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आल्लापल्ली येथील फारेस्ट ग्राउंड(क्रिडा संकुलंन) या ठिकाणी आज ठिक ७:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आले...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आल्लापल्ली :- दिनांक २६ जानेवारी २०२३ ला मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल(सर्कल)क्रिकेट सामन्यांचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल आल्लापल्ली...

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस…

चंद्रपुर: आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या...

आयुष्मान कार्ड असेल तर मिळेल राव,पाच लाखांपर्यंतचा मोफत ईलाज..

बळीराम काळे जिवती : ( तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य राज्य सरकारने माहत्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून,आयुष्मान भारत ही...

सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन… हजारो महिलांची उपस्थिती – मकरसंक्रांत निमित वाणाचे वितरण…

सिंदेवाही- महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी- कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राज्याच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!