Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी तालुक्यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या ; गोंडपिपरी भाजपची मागणी

गोंडपिपरी तालुक्यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या ; गोंडपिपरी भाजपची मागणी

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

गोंडपिपरी तालुक्यात समाजमन हादरविणार्या दोन घटना घडल्या.मिनीआयटीआयचा संचालकाने अल्पवयीन विध्यार्थीनीचा विनयभंग केला.तर येन बोथला येथे काकानेच पुतणीवर अतिप्रसंग केल्याची निंदनिय घटना घडली.या दोन्ही घटनेतील दोषीना फासावर लटकवा,अशी मागणि गोंडपिपरी भाजपाने निवेदनातून केली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील लागोपाट घडलेल्या अत्याचाराचा घटनेनी समाजमन हादरले आहे.मिनिआयटीआयचा संचालकाने विध्यार्थीनीचा विनयभंग केला.येनबोथला येथिल काकाने पुतणीवर बलात्कार केला. या दोन्ही घटनेतील मुली अल्पवयीन होत्या. अल्पवयीन मुली अत्याचाराचा बळी ठरत आहे.तालुक्यात या घटना वाढत आहेत,ही चिंतेची बाब आहे.त्यामुळे या घटनेतील दोषी विरूध्द फास्ट ट्रॕक कोर्टव्दारे फासीची शिक्षा देण्यात यावी तसेच भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत यासाठी योग्य चौकशी करून पिढीत कुटूंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनात केली आहे.सदर निवेदन तहसिलदारांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. यावेळी दुधे ताई भाजपा महा.प्रदेश कार्यकारणी सदस्य, बबन निकोडे भाजपा तालुकध्यक्ष, नीलेश संगमवार भाजपा नेते, अमर बोडलावार, सुनीता येग्गेवार, वैष्णवी बोडलावार जि.प.सदस्य, स्वाती वडपल्लिवर जि.प.सदस्य, भुमिताई पिपरे, रोषणी अनमुलवार, अरुण कोडापे ,उप सभापती प.स., राकेश पून ,नगरसेवक, निलेश पुलगमकर, सुनील फुकट, गणेश डहाडे, मनीष वासमवार, गणपती चौधरी, नाना येल्लेवार, मायाताई वाघाडे, सुरेखा श्रिकोंडावार भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थीत होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!