बापरे…! गाडीचा चाकात अडकला भला मोठा अजगर

0
503

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एका घरात अजगर शिरल्यानं तिथं उपस्थित असलेल्या माणसांनी बंदुकीने गोळी मारून अजगराला मारून टाकलं. त्यानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात होती. माणुसकी शिल्लक नसल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. सध्या पुन्हा एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. गाडीच्या चाकांमध्ये हा १४ फुट लांब अजगर अडकला आहे.

Advertisements

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पावसाळ्यात अनेकदा साप गाडीच्या चाकात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी असं कॅप्शन दिलं आहे. १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे.

Advertisements

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, जर साप किंवा अजगर गाडीच्या चाकात अडकला तर आधी चाक खोलून मग बाहेर काढलं जातं. हा अजगर खूप मोठा असल्यामुळे सहजासहजी बाहेर निघणं कठीण होतं. तरिही अत्यंत हुशारीनं त्यांनी या अजगराला काढलं आहे. नंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अजगराच्या अंगावर पाणी टाकलं आहे. अनेकांना या व्हिडीओला पसंती दिली आहे. कारण अजगराला कोणताही धोका न पोहोचवता सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

साभार-मिडीया वाच

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here