चंद्रपूर -प्रतिनिधी- काल रविवार दि. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे आैचित्य साधून चन्द्रपुर जिल्ह्यातील जिवती, कोरपना राजुरा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात कार्य करणांऱ्या शिक्षकांचा शानदार सन्मान सोहळा बल्लारपूर औद्योगिक नगरीतील पी.डब्लू .डि. सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जे .सी. नरेंद्रजी बारडीया यांनी विभूषित केले हाेते तर प्रमुख पाहुणे म्हणून जे.सी.भरत बजाज उपस्थित हाेते .पार पडलेल्या या देखण्या सत्कार सोहळ्यात अति दुर्गम जिवती, कोरपना, व राजुरातील शिक्षकांचे कर्तृत्वांचे विविध पैलू वर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमात राजुराच्या इंफॅन्ट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूलच्या शिक्षिका मेघा धोटे यांचा मानचिन्ह, प्रसशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन गाैरव करण्यात आला. शिक्षकांचे कार्य पाहून भारावून गेलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष अवाक् झाले. जि.प . शिक्षकांची डागाळलेली प्रतिमा नक्कीच यामुळे सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा गाैरव साेहळा तब्बल चार तासांपर्यंत चालला.सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेसी सुषमा शुक्ला यांनी केले .तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन स्वातंत्रकूमार शुकला यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेसी स्मृती व्यवहारे, जेसी सुशीला पोरद्दीवार, जेसी जयश्री शेंडे, जेसी सुषमा शुक्ला व इतर जेसी राजुरा राँयल्स यांनी अथक परिश्रम घेतले.
इंफॅन्ट शाळेचे संस्थाचालक सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे ,व्यवस्थापक ,मुख्याद्यापक शिक्षक वृंद, तथा मित्र परिवारांनी मेघा धाेटे यांचे अभिनदंन केले आहे. मेघा धाेटे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या एक मुख्य मार्गदर्शिका आहे .
बल्हारपूरात शिक्षक दिन कार्यक्रम साजरा ! सहजं सुचलं व्यासपीठाच्या मार्गदर्शिका मेघा धाेटे यांचा झाला सन्मान…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES