Home गडचिरोली राज्यातील मंदिर तात्काळ उघडा -आमदार डॉ. देवराव होळी

राज्यातील मंदिर तात्काळ उघडा -आमदार डॉ. देवराव होळी

गडचिरोली:-  राज्यातील मंदिर उघडण्यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात मार्कंडा देवस्थान येथे शंखनाद आंदोलन जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत तर जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांच्या नेतृत्वात धानोरा येथे आंदोलन…राज्यात ईतर सर्व बाबींचे निर्बंध उठवण्यात आलेली असताना कोरोनाच्या नावाखाली केवळ मंदिर देवस्थान यांना लक्ष्य करून अजूनपर्यंत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आलेले नाही. यामुळे राज्य सरकार विरोधात संताप असून राज्य शासनाने मंदिराचे दरवाजे लवकरात लवकर उघडावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मार्कंडा देवस्थान येथील शंखनाद आंदोलनाच्या प्रसंगी सरकारला केली.
यावेळी चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा , तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे,ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, महामंत्री लोमेश सातपुते, विलास चरडूके ,मार्कंडा परिसरातील धार्मिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशामध्ये सर्वत्र मंदिर देवदर्शन सुरू करण्यात आलेली आहेत केवळ महाराष्ट्र राज्यात इतर सर्व बाबींवरील निर्बंध उठवण्यात आलेली असताना मंदिरांना उघडण्यासाठी बंधने टाकण्यात आलेली आहे. एकीकडे दारू विक्री करिता परवानगी देण्यात आली . दारूची दुकाने,बार सुरू करण्यात आली मात्र मंदिर सुरू करता आले नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे आमदार महोदय म्हणाले . मंदीर देवस्थान बंद असल्याने अनेक लहान-मोठ्या व्यावसायिक ,व्यापारी, हॉटेल रेस्टॉरंट,मजुरी करणारे, यांचे फार मोठे नुकसान होत असून हातावर रोजी असणारे नारळ,अगरबत्ती फुल विक्रेते, ऑटोरिक्षावाले, पूजा साहित्य विकणारे अशा अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे .त्यामुळे राज्य शासनाने तातडीने राज्यातील मंदिरे सुरू करावी अशी मागणी या आंदोलना प्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

गडचिरोली पोलीस विभागाकडून परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना जाहीर

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार १९ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे....

गडचिरोली जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) प्रतिनिधी / गडचिरोली : सध्या कोव्हिड-१९ चे रुग्ण जिल्हयात वाढत असल्याने सदर साथरोगावर प्रादुर्भाव व रोखयाम नियंत्रित करण्यास्तव सर्व शासकीय /...

गडचिरोली जिल्ह्यात आज ०३ नव्या कोरोना बधितांची नोंद तर ०३ जण कोरोना मुक्त

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 437 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 03 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!