Homeचंद्रपूरअक्षय देशमुख(वैद्यकीय आणि मनचिकित्सक सामाजिक कार्यकर्ता,चंद्रपूर) यांचा "Covid-19 बाबत समुपदेशन ही काळाची...

अक्षय देशमुख(वैद्यकीय आणि मनचिकित्सक सामाजिक कार्यकर्ता,चंद्रपूर) यांचा “Covid-19 बाबत समुपदेशन ही काळाची गरज” हा लेख

गेल्या वर्षभरापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्युदराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या कोरोना ही जागतिक महामारी नष्ट करण्यासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. कोरोना होऊ नये म्हणून कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे सर्व जनतेला माहिती झाले आहे त्याचा अवलंबही होत आहे. उदा:- त्रिसूत्रीचे पालन म्हणजेच तोंडाला मास्क लावणे, किमान दोन मीटर सामाजिक अंतर, स्वच्छ हात धुणे किंवा हात निर्जुतिक करणे तसेच एकापासून दुसऱ्याला होऊ नये स्वतःचे रक्षण करता यावे यासाठी व गर्दी होऊ नये म्हणून जनता कर्फ्यू, लॉकडाऊनसारखे पर्यायही सुरू झाले.

त्यापुढे Rapid Antigen Test व RT-PCR Test द्वारे पॉझिटिव्ह/निगेटिव्ह रिपोर्ट कळू लागले. त्याही पुढे जाऊन लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. म्हणजेच कोरोना वर मात करण्यासाठी, कोरोनाला हरवण्यासाठी सरकार, शासन, जनता यांचे खूप प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने जे-जे प्रयत्न केले आणि करत आहे ते खूपच कौतुकास्पद आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि शासन स्तरावर आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पत्रकार, सोशल मीडिया, सामाजिक संस्था व इतर विभाग यांनी जे समर्पित भावनेने रात्रंदिवस मेहनतीने जिद्दीने कार्य केले आणि करत आहेत त्या कामाला सलाम.

जनतेनेही स्वतःची काही दिवस उपजीविका सोडून अगदी एक वेळ खायला मिळते का नाही हा सुद्धा विचार न करता कोरोना महामारीला हरवण्यासाठी कडक लॉकडाऊनचे पालन करून सरकारला व शासनाला एकजुटीने साथ दिली ती अविस्मरणीय आहे. जनतेचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. एवढे सर्व असतांनाही कोरोना जात नाही या ठिकाणी मला आवर्जून सांगावेसे वाटते की कोविड-19 हा आजार पुर्णपणे बरा होतो. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळावेच लागतील. त्याला पर्याय नाही परंतु एखाद्या वेळेस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याची धास्ती मनाला लावू नका. फक्त विचार मनी एक ठेवावा मी माझ्या कुटुंबासाठी, देशाच्या रक्षणासाठी लवकरच बरा होऊन येणार आहे.

माझ्या काळजीसाठी माझे देवरूपी डॉक्टर व नर्स माझ्यासोबत आहे.सद्यास्थितीत सर्दी, खोकला, ताप झाला तरीही व्यक्तीच्या मनात खूप भीती निर्माण होते. ही लक्षणे जाणवल्यानंतरही व्यक्ती कोरोना चाचणी करायलाच तयार नसतो. कधी-कधी लक्षणात वाढ झाल्यानंतर त्याचे रूपांतर कफ, न्यूमोनिया यासारख्या आजरामध्ये होते. श्वास घ्यायला अडचण निर्माण होते त्यावेळेस चाचणी करावी लागते.

चाचणी करण्याचा आधीपासूनच व्यक्ती विचार करतो की माझा रिपोर्ट काय येईल तोपर्यंत बहुतांशी व्यक्ती तणावाखाली असतात. त्यातल्या त्यात चाचणी पॉझिटिव्ह आली तर तणाव आणखी वाढतो आणि ज्या वेळेस उपचारासाठी व्यक्ती भरती होतो त्यावेळेस कुटुंबासहित रुग्ण तणावाखाली येतात, रुग्णांवर औषधोपचार सुरू असतांनाही खूप तणावामुळे त्याला बरे होण्यास वेळ लागतो. काही वेळेस वृत्तपत्रामध्ये पण वाचण्यात येते की कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णांनी आत्महत्या केली हे एकूण मन सुन्न होते, की मरण एवढे स्वस्त आहे काय?

एखाद्या घटनेची शहानिशा करत असताना एकच ऐकू येते की घटना घडेल असे वाटत नव्हते पण एखाद्या वेळेस की भीतीपोटी, तणावामुळे घडले असेल असे वाटते त्यामुळे समुपदेशन खूप महत्त्वाचे आहे. समुपदेशन हे संबंधित रुग्णांचे व कुटुंबाचे झालेच पाहिजे यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन असावी, समुपदेशन कक्ष असावे, आजच्या युगामध्ये सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा समुपदेशन होऊ शकते. शासनाने नवीन समुपदेशक पदाची कोरोना सेवेत भरती करावी म्हणजेच उपचार सोबत समुपदेशक हा समुपदेशन करून रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबातील मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करेल. तसेच नागरिकांच्या मनातील भीतीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल आणि समुपदेशन याचा फायदा नक्कीच जनतेला होईल.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!