गडचिरोली पोलीस दलाचे माओवादावर “ऑपरेशन अंतिम प्रहार”
जिल्हा संपादक नितेश खडसे

7 फेब्राुवारी 2026 रोजीच्या फोदेवाडा चकमकीमध्ये एका सी-60 जवानाच्या हत्येत सक्रिय सहभाग असलेल्या जहाल माओवाद्यांसहीत एकूण 08 माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने केली अटक
. सलग राबविलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम व चार सदस्य पदावरील माओवाद्यांना अटक
. तेलंगणा राज्यातून 04, मौजा कुमनार येथून 02 व मौजा नैताळा येथून 02 अशा एकूण 08 माओवाद्यांना मोठ¬ा शिताफिने अटक
. कंपनी क्र. 10 चा प्रभारी डिव्हीसीएम राजु मंगलु वेको व त्याची पत्नी जन्नी ऊर्फ नगी येमला (पीपीसीएम, कंपनी क्र. 10) यांना 01 एके 47 रायफल, 01 .303 रायफल व 01 बारा बोअर रायफलसह मौजा कुमनार येथून अटक
. मौजा नैताळा येथून 02 महिला माओवाद्यांना त्यांच्या 01 एसएलआर रायफल, 01 बारा बोअर रायफल, 01 सिंगल शॉट रायफल व इतर माओवादी साहित्यासह घेण्यात आले ताब्यात
. चौकशी दरम्यान प्राप्त माहितीवरून माओवद्यांनी घातपाताच्या उद्देशाने मोठ¬ा प्रमाणावर लपवून ठेवलेला शस्त्रसाठा तसचे एकुण 65 लाख 34 हजार रुपये रोख रक्कम जप्त
. महाराष्ट्र शासनाने आठही माओवाद्यांवर जाहीर केले होते एकूण 64 लाख रुपयांचे बक्षीस.
. अभियानादरम्यान 02 एलएमजी रायफल, 04 एके 47 रायफल, 04 एसएलआर रायफल, 03 इंन्सास रायफल सह माओवाद्यांकडून करण्यात आले एकुण 51 अग्निशस्त्र जप्त
. गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा; अभिलेखावरील एकही माओवादी शिल्लक नाही
गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद जवळजवळ संपुष्टात आला असून माओवाद्यांची गडचिरोली जिल्ह्रातील हालचाल देखील जवळजवळ संपुष्टात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखा वरील उर्वरित माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी वारंवार पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येत होते. मात्र आत्मसमर्पण न करता लपून राहण्याचा प्रयत्न करणाया माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विशेष शोध मोहीम राबविण्यात येऊन गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन अंतिम प्रहार” राबविण्यात येत होते. यावरून गडचिरोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत शिताफीने तेलंगाणा राज्यातून 04, मौजा कुमनार येथून 02 आणि मौजा नैताळा येथून 02 अशा एकूण 08 माओवाद्यांना अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दि. 12/05/2026 रोजी विशेष अभियान पथक, प्राणहिता येथील एक पोलीस पथक गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधार रुकमापूर रेल्वे स्टेशन, जि. विकाराबाद (तेलंगाणा) येथे रवाना झाले होते. दिनांक 13 मे 2026 रोजी सदर रेल्वे स्टेशन येथे पोहचताच मिळालेल्या माहितीची खातरजमा करीत असताना, स्टेशन वरील 03 अनोळखी पुरुष व 01 अनोळखी महिला यांनी पोलीस पथकास पाहून संशयास्पद हालचाल करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन अत्यंत शिताफिने त्यांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपली नावे 1) जयराम मोंगे गावडे, (पीपीसीएम कंपनी क्र. 10) रा. गिनलगुडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, 2) मुकेश ऊर्फ लच्छु लक्कु अवलाम (प्रभाकर याचा बॉडीगार्ड), रा. पिडीया, ता. गंगलूर, जि. बीजापूर (छ.ग.) 3) विजय ऊर्फ मंगडू हंुगा तामो (झोन टीडी सदस्य) रा. चिमलीपेंटा, ता. कोटा, जि. सुकमा (छ.ग.), व 4) रजिता ऊर्फ शामबत्ती कोसा मडावी (सदस्य कोअर दलम, कंपनी क्र. 05), रा. कोंडाकोट, जि. नारायणपूर (छ.ग.) असे असल्याचे सांगितले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की, सदर चौघे इसम हे पोलीसांच्या अभिलेखावरील माओवादी असून या चारही माओवाद्यांंचा दि. 07 फेब्राुवारी 2026 रोजी मौजा फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. असे निष्पन्न झाल्याने त्यांना उपपोस्टे लाहेरी येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. 01/2026 कलम 103, 109, 132, 121 (1), 189(2), 190, 191 (2), 191 (3) 61 (2) भा.न्या.स., सहकलम 3/25, 5/27 भाहका, कलम 3, 4, 5, भास्फोका, कलम 13, 16, 18, 20, 23 बेकायदा कृत्य अधि. व कलम 135 महा. पो. अधि. या गुन्ह्रात दि. 13/05/2026 रोजी अटक करण्यात आली आहे. या दरम्यान अटक माओवाद्यांच्या अधिक चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून मौजा फोदवाडा जंगल परिसरामध्ये पोलीस जवानांवर घातपात करून हल्ला करण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्रे व दारूगोळा लपवून ठेवले असल्याचे सांगितले होते. या माहितीवरून पोलीस पथकांनी दि. 15/05/26 रोजी फोदेवाडा जंगल परिसरात शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरून एक .303 रायफल, 02 बारा बोअर रायफल, 10 जिवंत राऊंडसह मोठ¬ा प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तसेच दिनांक 14/05/26 रोजी पोस्टे लाहेरी हद्दीतील मौजा कुमनार व पोमके गर्देवाडा हद्दीतील मौजा नैताळा येथे काही सशस्त्र माओवादी उपविभाग भामरागड व हेडरी अंतर्गत नवनिर्मित पोलीस मदत केंद्रावर हल्ला करण्याच्या उद्देशाने लपून बसले असल्याच्या गोपनीय माहीतीच्या आधारे माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफकडून विशेष शोध मोहीम राबविण्यात आल्या होत्या. सदर शोध मोहीमेदरम्यान पोस्टे लाहेरी हद्दीतील मौजा कुमनार गावात अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा यांच्या नेतृत्वात शोध अभियान सुरु असताना पोलीस पथकास काही सशस्त्र माओवादी गावात लपून बसल्याचे दिसून आले होते. पोलीस पथकाची चाहूल लागताच लपून बसलेल्या माओवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने गोळीबार न करता दोन माओवाद्यांचा अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्यांना त्यांच्या 01 एके 47 रायफल, एक .303 रायफल, 01 बारा बोअर रायफल व इतर माओवादी साहित्यासह ताब्यात घेतले होते. सदर दोन्ही माओवाद्यांची कसून चौकशी केल्यानंतर ते पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी 1) राजु उर्फ मंगडु वेको (डिव्हीसीएम, कंपनी क्र. 10) व 2) जनी उर्फ नगी उंगाल येमला (पीपीसीएम, कंपनी क्र. 10) असल्याचे निष्पन्न झाल्याने उपपोस्टे लाहेरी येथे भा. न्या. सं. कलम 189 (2), 61, म. पो. अधि. 1951 कलम 135, भा. ह. का. 1959 कलम 3/25, भास्फोका कलम 3, 4, 5, बेकायदा कृत्य अधि. कलम 13, 16, 18, 20, 23 अन्वये अप क्र. 05/2026 दाखल करून अटक करण्यात आली होती. सदर दोन्ही माओवाद्यांना मा. न्यायालयाने दि. 15/05/2026 ते दि. 22/05/2026 पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. यादरम्यान दोन्ही माओवाद्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी पोमकें बंगाडी हद्दीतील मौजा गुंडेनुर जंगल परिसरात पोलीस जवानांवर घातपात करून हल्ला करण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्रे व दारूगोळा लपवून ठेवले असल्याचे सांगितले होते. या माहितीवरून पोलीस पथकांनी आज दि. 16/05/26 रोजी गुंडेनुर जंगल परिसरात शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरून 01 एसएलआर एलएमजी रायफल, 01 इंन्सास एलएमजी रायफल, 03 एके 47 रायफल, 03 एसएलआर रायफल, 02 इंन्सास रायफल, एक .303 रायफल, 01 देशी बनावटीची हत्यार, 01 बिजीएल लाँचर, 18 मॅग्जिन, 358 जिवंत काडतुस सह मोठ¬ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच सदर ठिकाणावरुन एकुण 63 लाख 84 हजार रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.
यासोबतच दिनांक 14/05/26 रोजी गोपनीय माहीतीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या नेतृत्वाखाली पोमके गर्देवाडा हद्दीतील मौजा नैताळा गावात शोध अभियान सुरु असताना पोलीस पथकास काही सशस्त्र माओवादी गावातील घरांचा आडोसा घेऊन लपून बसल्याचे दिसून आले होते. पोलीस पथकाची चाहूल लागताच लपून बसलेल्या माओवाद्यांनी गावालगतच्या जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून गोळीबार न करता दोन माओवाद्यांना त्यांच्या 01 एसएलआर रायफल, 01 बारा बोअर रायफल, 01 सिंगल शॉट रायफल शस्त्रांसह ताब्यात घेतले होते. मात्र यावेळी काही माओवादी जंगलाचा फायदा घेत तेथून पसार झाले. ताब्यात घेतलेल्या माओवाद्यांची कसून चौकशी केल्यानंतर ते पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी 1) ज्योती उर्फ अकिला उर्फ समिता पोटावी (डिव्हीसीएम, झोन टीडी टेक्नीकल) व 2) आमती उर्फ आयती उर्फ संध्या इडमा पोडीयाम (सदस्य, कंपनी क्र. 10) असल्याचे निष्पन्न झाल्याने पोस्टे वांगेतुरी येथे भा. न्या. सं. कलम 189 (2), 61, म. पो. अधि. 1951 कलम 135, भा. ह. का. 1959 कलम 3/25, भास्फोका कलम 3, 4, 5, बेकायदा कृत्य अधि. कलम 13, 16, 18, 20, 23 अन्वये अप क्र. 03/2026 दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही माओवाद्यांना मा. न्यायालयाने दि. 15/05/2026 ते दि. 22/05/2026 पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. यादरम्यान दोन्ही माओवाद्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी पोमके गर्देवाडा हद्दीतील मौजा नैताळा जंगल परिसरात पोलीस जवानांवर घातपात करून हल्ला करण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्रे व दारूगोळा लपवून ठेवले असल्याचे सांगितले होते. या माहितीवरून पोलीस पथकांनी आज दि. 16/05/26 रोजी मौजा नैताळा जंगल परिसरात शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरून 01 इंन्सास रायफल, एक .303 रायफल, 08 बारा बोअर रायफल, 04 डेटोनेटर, 04 मॅग्जिन, 66 जिवंत काडतुस, 11 बिजीएल सेल, 01 बिजीएल लाँचर सह मोठ¬ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसला असून पोलीस दलाच्या अभिलेखावरील 06 पैकी 05 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून एक महिला माओवादी नामे मोनी मडावी कंपनी क्र. 10 सदस्य हिने देखिल बिजापूर (छ.ग.) येथे आत्मसमर्पण केल्याने पोलीस दलाच्या अभिलेखावरील एकही माओवादी शिल्लक राहिलेला नाही.
. अटक माओवादी आरोपींची माहिती
1) राजु ऊर्फ मंगडु मंगलु वेको
दलममधील कार्यकाळ
. सन 2010 मध्ये माटवाडा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2012 पर्यंत काम केले.
. सन 2012 साली कंपनी क्रमांक 10 मध्ये बदली होऊन सन 2014 पर्यंत काम केले.
. सन 2015 मध्ये समन्वय दलम महाराष्ट्र सदस्य पदावर काम केले.
. सन 2015 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन सदस्य पदावर काम केले.
. सन 2016 पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन 2024 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये काम केले.
. सन 2025 मध्ये डिवीसीएम पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. 10 मध्ये आजपावेतो काम केले.
• कार्यकाळात दाखल गुन्हे
त्याच्यावर आजपर्यंत एकुण 27 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 14 चकमक, 07 खुन व 06 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
2) ज्योती ऊर्फ अकिला ऊर्फ समिता पोटावी
• दलममधील कार्यकाळ
. 2006 मध्ये झोन टेक्नीकल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन 2008 पर्यंत काम केले.
. सन 2008 मध्ये रावघाट दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर काम केले.
. सन 2009 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन रावघाट दलममध्ये सन 2013 पर्यंत काम केले.
. सन 2013 मध्ये रावघाट दलममधून कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन सन 2025 पर्यंत पीपीसीएम पदावर काम केले.
. सन 2025 मध्ये डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
3) जन्नी ऊर्फ नगी उंगाल येमला
. दलममधील कार्यकाळ
. सन 2016 मध्ये पालणार दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2019 पर्यंत काम केले.
. सन 2019 मध्ये कट्टेगल दलममध्ये बदली होऊन सन 2022 पर्यंत काम केले.
. सन 2022 मध्ये पेरमिली दलममध्ये बदली होऊन सन 2023 पर्यंत काम केले.
. सन 2023 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊनसन 2025 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
. सन 2025 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. 10 मध्ये आजपावेतो काम केले.
कार्यकाळात दाखल गुन्हे
तिच्यावर आजपर्यंत एकुण 06 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 03 चकमक, 02 खुन व 01 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
4) जयराम मोंगे गावडे
. दलममधील कार्यकाळ
. सन 2017 मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2025 पर्यंत काम केले.
. सन 2025 साली कंपनी क्र. 10 मध्ये बदली होवून पीपीसीएम पदावर आजपावेतो काम केले.
कार्यकाळात दाखल गुन्हे
त्याच्यावर आजपर्यंत एकुण 27 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 11 चकमक, 13 खुन व 03 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
5) मुकेश ऊर्फ लच्छु लक्कु अवलाम
. दलममधील कार्यकाळ
. सन 2020 मध्ये गंगालुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जून 2021 पर्यंत काम केले.
. माहे जून 2021 मध्ये कंपनी क्र. 07 मध्ये बदली होऊन माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत काम केले.
. माहे नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये डिकेएसझेडसीएम प्रभाकरचा अंगरक्षक म्हणून बदली होवून आजपावेतो काम केले.
कार्यकाळात दाखल गुन्हे
त्याच्यावर 01 चकमकीचा गुन्हा दाखल आहे.
6) विजय ऊर्फ मंगडू हंुगा तामो
. दलममधील कार्यकाळ
. सन 2024 मध्ये जागरगुडा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2025 पर्यंत काम केले.
. सन 2025 मध्ये टेक्नीकल टिम माड एरीयामध्ये बदली होऊन आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
7) रजिता ऊर्फ शामबत्ती कोसा मडावी
. दलममधील कार्यकाळ
. सन 2018 मध्ये माड एरीया दलममध्ये भरती होऊन सदस्य पदावर काम केले.
. सन 2018 मध्ये इंद्रावती दलममध्ये बदली होऊन माहे ऑक्टोंबर 2025 पर्यंत काम केले.
. माहे ऑक्टोंबर 2025 मध्ये झोन टेक्नीकल दलममध्ये बदली होऊन माहे मार्च 2026 पर्यंत काम केले.
. माहे मार्च 2026 मध्ये कोअर दलम कंपनी क्र. 05 माड एरीया मध्ये बदली होऊन सदस्य पदावर आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
8) आमती ऊर्फ आयती ऊर्फ संध्या इडमा पोडीयाम
. दलममधील कार्यकाळ
. सन 2021 मध्ये पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2022 पर्यंत काम केले.
. सन 2022 मध्ये कंपनी क्रं 10 मध्ये बदली होऊन पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर आजपावेतो काम केले.
कार्यकाळात दाखल गुन्हे
तिच्यावर आजपर्यंत एकुण 07 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 04 चकमक, 01 खुन व 02 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
1) महाराष्ट्र शासनाने राजु उर्फ मंगडु वेको याच्या अटकेवर 16 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
2) महाराष्ट्र शासनाने ज्योती उर्फ अकिला उर्फ समिता पोटावी हिच्या अटकेवर 16 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
3) महाराष्ट्र शासनाने जनी उर्फ नगी उंगाल येमला हिच्या अटकेवर 08 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
4) महाराष्ट्र शासनाने जयराम मोंगे गावडे याच्या अटकेवर 08 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
5) महाराष्ट्र शासनाने मुकेश ऊर्फ लच्छु लक्कु अवलाम याच्या अटकेवर 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
6) महाराष्ट्र शासनाने विजय ऊर्फ मंगडू हंुगा तामो याच्या अटकेवर 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
7) महाराष्ट्र शासनाने रजिता ऊर्फ शामबत्ती कोसा मडावी हिच्या अटकेवर 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
8) महाराष्ट्र शासनाने आमती उर्फ आयती उर्फ संध्या इडमा पोडीयाम हिच्या अटकेवर 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान), नागपूर श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र श्री. योगेश कुमार, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, विशेष अभियान पथक, गडचिरोली येथील अधिकारी व जवान यांनी पार पाडली.







