“आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकालात दणदणीत यश; विज्ञान शाखेत ९५.६८% सह सर्व शाखांचा उल्लेखनीय टक्का”
प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

आनंदवन, वरोरा – येथील आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा सत्र २०२५-२६ चा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत ९५.६८%, कला शाखेत ८७.९६% तर वाणिज्य शाखेत ८६.१९% इतका उल्लेखनीय निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेमध्ये तन्मय अरविंद सातपुते (८६.८३%) याने प्रथम क्रमांक मिळवला असून प्रितम यशवंत राऊत (८४.३३%) व तन्मय संतोष ताडूरवार (८०.६७%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. तसेच दिशांत तुरे, रिया लेडांगे, संबोधी अलोने आदी विद्यार्थ्यांनीही उत्तम यश मिळवले.
वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेत कु. गुंजन प्रेमकुमार ओझा (७९.५०%) हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या पाठोपाठ विनायक कोटुरवार (७७.६७%) व कु. सिद्धि गड्डमवार (७६.८३%) यांनी यश मिळवले. वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेत सुरज संजय फुलारे (७९.५०%) प्रथम, सुहाग चौधरी (७४.३३%) द्वितीय तर रजनी डांगे व श्रुतिका वाघ (७२.६७%) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
कला शाखेत कु. भारती नन्नावरे (७५.१७%) व कु. ऋतुजा नन्नावरे (७३.३३%) यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुडकर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.







