राजुरात दिव्यज्योती ट्युशन क्लासेसचा पुन्हा डंका; CBSE १०वीत उल्लेखनीय यश
जिल्हा संपादक प्रशांत बिट्टूरवार
राजुरा :
राजुरातील दिव्यज्योती ट्युशन क्लासेसने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या गुणवत्तेची छाप उमटवत CBSE इयत्ता १०वी बोर्ड परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल देत राजुरा तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संस्थेचे संस्थापक व संचालक श्री. आशिष चक्रवर्ती सर आणि अय्याज सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यंदाही संस्थेचा निकाल सर्वोत्तम ठरवला आहे. परिश्रमी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी उच्च टक्केवारी मिळवत आपले आणि संस्थेचे नाव उज्ज्वल केले. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातही उच्च गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
संस्कृती कोंडेकर – 96.80% (विज्ञान 96)
मैथिली मत्ते – 96.60% (विज्ञान 94)
मृणाल वर्घाणे – 96.40% (विज्ञान 91)
तेजस्वी चापले – 96.00% (विज्ञान 94)
आनंदी लांडे – 94.40% (विज्ञान 92)
निरव शेंडे – 94.20% (विज्ञान 91)
अलेश डेठे – 93.80% (विज्ञान 85)
धनश्री पिंपळकर – 93.60% (विज्ञान 87)
अनुष्का उरकुडे – 92.40% (विज्ञान 91)
साई शिंदे – 92.40% (विज्ञान 86)
मधुरा गिरडकर – 92.00% (विज्ञान 84)
यथार्थ वानखेडे – 91.80% (विज्ञान 93)
नकुल चिंतलवार – 91.40% (विज्ञान 87)
अर्नव पोडे – 91.20% (विज्ञान 91)
ज्ञानदीपा वांढरे – 91.00% (विज्ञान 84)
वेदांत निमकर – 91.00% (विज्ञान 83)
वृशाली पाहनपाटे – 90.40% (विज्ञान 85)
भुवन कवळे – 90.00% (विज्ञान 87)
श्रेया कोपुलवार – 90.00% (विज्ञान 77)
दिव्यज्योती ट्युशन क्लासेसच्या संपूर्ण टीमने या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या निकालामुळे राजुरा परिसरात शिक्षणाच्या क्षेत्रात दिव्यज्योती ट्युशन क्लासेस पुन्हा एकदा अग्रस्थानी असल्याचे सिद्ध झाले आहे.







